AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: सलमान खानचा गणेशोत्सवातील खास अंदाज; लूक पाहून चाहत्यांना आठवला ‘वाँटेड’मधला राधे

Salman Khan: बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. खान कुटुंबाचाही गणपती उत्सव चाहत्यांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असतो. सलमान, सोहैल आणि कुटुंबातील इतर सदस्य अनेकदा या उत्सवात सहभागी होताना दिसतात.

| Updated on: Sep 15, 2026 | 12:53 PM
Share
Salman Khan: बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान त्याच्या खास स्टाईल आणि दमदार व्यक्तिमत्त्वामुळे कायमच चर्चेत असतो. आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सलमान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सलमान त्याचा भाऊ सोहैल खानच्या घरी आयोजित गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झाला.

1 / 5
यावेळी सलमानचा साधा पण लक्षवेधी लूक पाहून चाहत्यांना त्याच्या लोकप्रिय ‘वाँटेड’ चित्रपटातील राधे या व्यक्तिरेखेची आठवण झाली. खान कुटुंबात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही सोहेल खानच्या घरी बाप्पाच्या आगमनानिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यासाठी सलमान खानही त्याच्या भावाच्या घरी पोहोचला.

2 / 5
सलमान यावेळी अतिशय साध्या कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने निळ्या रंगाचा स्ट्राइप्स असलेला शर्ट आणि फिकट निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. मात्र, त्याच्या लूकमधील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे डोक्यावर बांधलेला पांढऱ्या रंगाचा स्कार्फ किंवा बँडाना. याच स्टाईलमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्या जुन्या चित्रपटाची आठवण काढली.

3 / 5
सलमान खानचा ‘वाँटेड’ हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रभुदेवा दिग्दर्शित या अॅक्शनपटात सलमानने राधे ही भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याचा रफ-अँड-टफ अंदाज, स्टाईल आणि अॅक्शन सीन्स आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत.

4 / 5
गणेशोत्सवासाठी सलमानने डोक्यावर बांधलेल्या पांढऱ्या स्कार्फमुळे अनेक चाहत्यांना ‘वाँटेड’मधील त्याचा लूक आठवला. त्याच्या या साध्या स्टाईलमध्येही जुन्या ‘भाईजान’ची झलक दिसत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

5 / 5
Follow Us
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित