AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut vs BJP : संजय राऊत पाकिस्तानी प्रवक्ते, विजयानंतर साधं टि्वट नाही, भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर

Sanjay Raut vs BJP : "चिपळूणमध्ये महापूर आलेला. उद्धव ठाकरेंनी तीन तासाचा दौरा केलेला. चिपळूणमधल्या लोकांना उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण कारकीर्दीत मदत मिळाली नाही. जेव्हा महायुतीच सरकार आलं, तेव्हा चिपळूणमधील मराठवाड्यातील नुकसानाग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फक्त कोरडे उमाळे येतात" अशी टीका नवनाथ बन यांनी केली.

Sanjay Raut vs BJP : संजय राऊत पाकिस्तानी प्रवक्ते, विजयानंतर साधं टि्वट नाही, भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर
Sanjay Raut-Navnath Ban
| Updated on: Sep 30, 2025 | 11:42 AM
Share

“जनाब संजय राऊत यांनी भाजपवर टीका करण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सेवा करणं, मदत करणं यासाठी सरकार कटीबद्ध आहे. त्यांना डायरेकट खात्यात पैसे दिले जात आहेत. आज कॅबिनेटची बैठक आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार भक्कमपणे उभं आहे. संजय राऊत यांनी नाकाने कांदे सोलणे बंद करावे. आपण बांधावर जाऊन किती मदत केली याचा विचार करावा. उद्धव ठाकरे बांधावर गेले होते. पण त्यांना कोरडे उमाळे दाटून आले. शेतकऱ्यांना एका दमडीची मदत उबाठा गटाकडून किंवा संजय राऊत यांनी केलेली नाही” असं प्रत्युत्तर भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी दिलं.

“भाजपचे कार्यकर्ते शेतकऱ्यांसोबत उभे आहेत. उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या उबाठआ गटाने एक रुपयाची मदत शेतकऱ्यांना केलेली नाही. त्यामुळे मराठवाड्याच्या पूरग्रस्तांच्या प्रश्नावर बोलण्याचा संजय राऊत यांना अधिकार नाही” असं नवनाथ बन म्हणाले. “निकष न पाळता मदत करणार हे देवा भाऊंनी आधीच सांगितलं आहे. राज्य सरकार सजग आहे. अभूतपूर्व संकट आहे. आजपर्यंतच्या पिढ्यांनी असं संकट बघितलं नव्हतं. जमीन खरडून गेली आहे, या परिस्थिती कुठलही निकष न पाळता शेतकऱ्यांना मदत करण्याच काम राज्य सरकार करत आहे. विशेष अधिवेशनाची मागणी करतायत. पण त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात हा खर्च करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत पोहोचवण गरजेच आहे” असं नवनाथ बन म्हणाले.

‘शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी आनंदाची बातमी मिळेल’

“शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी आनंदाची बातमी मिळेल. सगळ्या दुष्काळग्रस्त, पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरभक्कम मदत मिळेल. संकट मोठं आहे. सरकारच्यावतीने जास्तीत जास्त मदत केली जात आहे. संजय राऊत मविआ सरकार असताना तुम्ही फसवी कर्जमाफी केली” असा आरोप नवनाथ बन यांनी केला.

‘संजय राऊत पाकिस्तानचे प्रवक्ते’

“खरतर भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांचं सर्व मानधन इंडियन आर्मीला दिलं. पाकिस्तानच्या क्रिकेटपटुंनी का दिलं याचा जाब संजय राऊत यांनी पाकिस्तानला विचारावा. संजय राऊत पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करत आहेत. भारताच्या विजयानंतर संजय राऊत यांनी साधं टि्वट केलं नाही. त्यांनी विजयानंतर सेलीब्रेशन करायला पाहिजे होतं. पाकिस्तान जिंकला असता, तर संजय राऊत यांना जास्त आनंद झाला असता” असं प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आलं.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.