AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“खासदार व्हायला गेले अन्…”, पंकजा मुंडेंचे मोठे विधान; म्हणाल्या “मी दिल्लीला…”

परळीतील गणेश मंदिर परिसरात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी एक मोठे विधान केले.

खासदार व्हायला गेले अन्..., पंकजा मुंडेंचे मोठे विधान; म्हणाल्या मी दिल्लीला...
पंकजा मुंडे
| Updated on: Nov 18, 2024 | 3:50 PM
Share

Pankaja Munde on MLA : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. सध्या राज्यात प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडताना दिसत आहेत. त्यातच आता भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी एक मिश्किल विधान केले आहे. “खासदार व्हायला गेले अन् आमदार झाले” असे वक्तव्य भाजपा सरचिटणीस व विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे यांनी केले. त्या परळीत बोलत होत्या.

परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी मंत्री धनंजय मुंडे यांना तिकीट देण्यात आले आहे. सध्या धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे या मैदानात उतरल्या आहेत. नुकतंच परळीतील गणेश मंदिर परिसरात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी एक मोठे विधान केले. “मी खासदार व्हायला गेले आणि आमदार झाले, तुमचीच नजर लागली, असं वाटतंय. मी दिल्लीला गेल्यावर इथे लक्ष देणार नाही, असं सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळेच असं झालं” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

“ताई दिल्लीला गेल्यावर मग आम्ही काय करणार…”

“लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी मी याठिकाणी असलेल्या अर्ध्याहून अधिक लोकांच्या पाया पडत होते. पाच-सहा हजार मतांनी झालेला पराभव हा पराभव नसतो. तुमचीच नजर लागली असं वाटतंय. मी दिल्लीला जाईन, दिल्लीला जाईन, असं सतत घोकत होते. ताई दिल्लीला गेल्यावर मग आम्ही काय करणार, त्या इथे लक्ष देणार नाहीत, असं सगळं यांचं चाललेलं. घ्या मग आता… आले मी परत तिथेच… खासदार करायला गेले आणि मी आमदार झाले” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

“माझी आणि धनंजय मुंडे यांची भूमिका आता बदलली आहे. पूर्वी मी विधानसभेत होते आणि ते विधानपरिषदेत होते. आता मी विधानपरिषदेत आहे आणि धनुभाऊ विधानसभेत आहेत. ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जातील. आमची भूमिका थोडीशी बदलली आहे आणि तुम्हा मतदारांना एकाच बटणात दोन आमदार मिळाले आहेत. तुम्हाला अजून काय पाहिजे”, असे पंकजा मुंडेंनी सांगितले.

परळीत लढत कशी?

दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढत आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी सहभागी आहे. महायुतीमध्ये अनेक मतदारसंघांत विद्यमान आमदाराला पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघांतून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली. कारण गेल्यावेळी या मतदारसंघातून धनंजय मुंडे विजयी झाले होते. यंदा ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच या ठिकाणी कमळाचे चिन्ह असलेला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळत आहे. १९७८ ची निवडणूक वगळता त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत परळीतून कमळाच्या चिन्हावर भाजप उमेदवार लढला होता.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?