AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनोद तावडे यांचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य, विजय झाल्यास भाजप धक्कातंत्र अवलंबणार? कोण होणार महायुतीचा CM?

महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. असं असताना आता भाजप नेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या एका वक्तव्याने याबाबतचा प्रश्न अधिकच गूढ बनला आहे.

विनोद तावडे यांचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य, विजय झाल्यास भाजप धक्कातंत्र अवलंबणार? कोण होणार महायुतीचा CM?
विनोद तावडेImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 05, 2024 | 7:30 PM
Share

महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर येत्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूने प्रचाराचा रणशिंग फुंकण्यात आला आहे. असं असलं तरी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजू्च्या पक्षांकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. ज्या पक्षाच्या जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री असं सूत्र आगामी काळात निवडणुकीनंतर ठरण्याची शक्यता आहे. महायुतीचं सरकार स्थापन झालं तर मुख्यमंत्री कोण असेल? असा प्रश्न आज भाजप नेते विनोद तावडे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. याचाच अर्थ भाजप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जर निकाल महायुतीच्या बाजूने आला तर पक्ष धक्कातंत्राचा अवलंब करत कुठल्यातरी नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदासाठी संधी देणार का? असा प्रश्न तावडे यांच्या वक्तव्याने निर्माण झाला आहे.

विनोद तावडे नेमकं काय म्हणाले?

भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ज्या नावांची चर्चा असते तेच मु्ख्यमंत्री होत नाहीत, असं विनोद तावडे म्हणाले आहेत. माझ्या नावाची चर्चा मग मी मुख्यमंत्री होणार नाही हे नक्की, असं विनोद तावडे म्हणाले आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशात तुम्ही पाहिलेलं आहे, असं उदाहरण देखील विनोद तावडे यांनी दिलं. “मुख्यमंत्रीपदासाठी ज्या नावाची चर्चा असते ते कधी मुख्यमंत्री होत नाहीत हे पक्क लक्षात ठेवा. काहीही करु नका. तुम्हाला राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा माहिती होते का? मध्य प्रदेशचे मोहन यादव माहिती होते का? त्यामुळे माझ्या नावाची चर्चा होतेय तर मी नक्की होणार नाही. बाकी बघू”, असं वक्तव्य विनोद तावडे यांनी केलं.

“विधानसभेच्या प्रचार सुरू झालाय. महायुतीने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जनतेचा लाभ करून दिला आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग, पायाभूत विकास यापासून सामान्य नागरिकांना लाभ होत आहे. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, विद्यार्थ्यांना 10 हजारांचा लाभ, उज्वला योजना अशा अनेक योजना सरकारने अंमलात आणल्या आहेत”, असं विनोद तावडे म्हणाले.

विनोद तावडे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“मध्य प्रदेशमध्ये असताना माध्यमांमध्ये बघितलं MVA नेत्यांनी गद्दारांचा पंचनामा केला म्हणे. मात्र गद्दारी कुणी केली? 2019 ला महायुती म्हणून मते मागितली. निकालानंतर विरोधी लोकांसोबत आघाडी केली. यावरून जनतेसोबत आणि मतांसोबत गद्दारी कुणी केली? उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर सगळं काही घडलं. यामुळे गद्दारांचा पंचनामा करायचा असेल तर ठाकरेंनी आरसा बघावा”, असा टोला विनोद तावडे यांनी लगावला.

“शरद पवार यांनी आरोप केला की, महायुती सरकारने इतर योजना बंद करून लाडकी बहीण योजनेत पैसा लावला. त्यातून त्यांनी लाडकी बहीण योजना बंद करायला सांगितलं. त्यांचं हे वक्तव्य भगिनींनी लक्षात ठेवावं”, असं विनोद तावडे म्हणाले. “ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा डान्सबार मधून खंडणी घेतली जात होती. उद्योजकांच्या घराखली बॉम्ब लावले गेले. हे जनतेला आठवते. मोदी सरकार केंद्रात 10 वर्षांपासून आहे. विरोधकांना एकही भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही”, असा दावा विनोद तावडे यांनी केला.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.