अभिमन्यू पवारांचा अनोखा निर्णय, शेत रस्त्यांच्या निर्मितीसाठी आमदार निधी वापरण्याचा निर्धार !

अभिमन्यू पवार यांनी त्यांचा संपूर्ण आमदार निधी हा शेत रस्त्यांच्या निर्मितीसाठी वापरायचा निर्णय घेतला आहे. Abhimanyu Pawar farm roads

अभिमन्यू पवारांचा अनोखा निर्णय, शेत रस्त्यांच्या निर्मितीसाठी आमदार निधी वापरण्याचा निर्धार !
अभिमन्यू पवार, आमदार

लातूर: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आमदार निधीबाबत अनोखा निर्णय घेतलाय. पवार यांनी त्यांचा संपूर्ण आमदार निधी हा शेत रस्त्यांच्या निर्मितीसाठी वापरायचा निर्णय घेतला आहे. (BJP MLA Abhimanyu Pawar decided to use Fund for development of farm roads)

शेती आणि पाणंद रस्ते निर्मितीचे ध्येय

एखाद्या आमदाराने आपला संपूर्ण निधी हा शेती रस्त्यांसाठी वापरण्याची हि बहुधा राज्यातली पहिलीच वेळ आहे. शेतांमध्ये पिकवलेला माल घरी आणायला रस्ता नसल्याने ग्रामीण भागातले शेतकरी त्रस्त असतात. नेमकी ही गोष्ट ओळखून आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने शेती आणि पाणंद रस्ते निर्मितीचं ध्येय स्वीकारले आहे .

औसा तालुक्यात 33 ठिकाणी काम सुरु

औसा तालुक्यातील 33 ठिकाणी 159 शेत रस्त्यांची कामे सध्या सुरु आहेत. साधारणपणे 414 किमीच्या अंतराचे ही कामे आहेत. शेत आणि शीव रस्ते झाले तरच शेतकऱ्यांना त्यांचा माल घरा पर्यंत आणि मार्केट पर्यंत पोहोचवता येणार आहे.

शेत रस्ते नसल्यानं वादाचे प्रसंग

अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून गावापर्यंत जाण्यास रस्ता नसल्याने भांडणे आणि वाद निर्माण होण्याचे शेकडो प्रकार घडतात. त्यामुळे शेत रस्ते झाले तर वाद कमी होतील. एक प्रकारे महसूल आणि पोलीस विभागाला त्याची मदत होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर पाणंद आणि शिव रस्त्यांसाठी तुटपुंजा निधी उपलब्ध करून दिला जात होता. मात्र आमदारांनी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने मोठ्या संख्येने शेत आणि पाणंद रस्ते तयार होतील अशी अपेक्षा आहे.

माझा आमदार निधी कुठे वापरायचं हे मी ठरवेन. आमदार निधी शेतरस्त्यांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली त्यांनंतर ते सहकार्य करत आहेत. आमदारपदाच्या कारकिर्दीतील आमदार निधी शेत रस्त्यांसाठी वापरणार असल्याचं, अभिमन्यू पवार म्हणाले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघून आनंद होतो, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

अवकाळीचा फटका कांद्याच्या बाजार भाववाढीचा सर्वसामान्यांना झटका

मुंबई एपीएमसी फळ बाजारात देवगड हापूसची आवक वाढली, दर मात्र चढेच

(BJP MLA Abhimanyu Pawar decided to use Fund for development of farm roads)

Published On - 4:02 pm, Tue, 23 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI