AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदार अमित साटम यांच्या कुटुंबाचा मोठा निर्णय, वाचून तुम्हीही कराल कडक सॅल्यूट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा आदर राखत भाजप आमदार अमित साटम यांची मुलगी माहीका साटम हिने दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत न जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

भाजप आमदार अमित साटम यांच्या कुटुंबाचा मोठा निर्णय, वाचून तुम्हीही कराल कडक सॅल्यूट
ameet satam
| Updated on: May 18, 2026 | 2:14 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातली जनतेला परदेशी दौरे करु नये, असे आवाहन केले आहे. आता याच आवाहनाचा सन्मान करत भाजप आमदार अमित साटम यांच्या १२ वर्षांच्या कन्या माहीका साटम हिने देशहितासाठी एक अत्यंत मोठा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी माहीकाची निवड झाली होती. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या एका आवाहनाचा आदर राखत साटम कुटुंबाने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी न होण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. आमदार अमित साटम यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

अमित साटम यांची कन्या माहीका साटम हिने अवघ्या १२ व्या वर्षी अत्यंत खडतर मेहनत करून कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट पटकावला आहे. तिच्या या यशाच्या जोरावर तिला थेट सोल, दक्षिण कोरिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होण्याची आणि जागतिक पातळीवर चमकण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. साटम कुटुंबासाठी आणि महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण होता. पण अमित साटम यांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

अमित साटम काय म्हणाले?

नमस्कार, मी आज माझ्या कुटुंबाचा महत्त्वाचा निर्णय शेअर करतो आहे. माझी १२ वर्षांची कन्या माहीका साटम ही नुकतीच कराटे ब्लॅक बेल्ट झाली. तिच्यासाठी आणि आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. सोल, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होण्याची तिला संधी मिळाली आहे.

देशाचे प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांनी देशहितासाठी काही काळ आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचे जे आवाहन देशवासियांना केले आहे, त्याचा आदर करत आम्ही आमच्या कुटुंबामध्ये एकमताने निर्णय घेतला आहे की, माहीका या स्पर्धेसाठी सोलला जाणार नाही. स्पर्धा येतात आणि जातात… भविष्यामध्ये माहीकाला अशा अनेक मोठ्या संधी मिळतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. पण ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना मनामध्ये ठेवून देश हितासाठी खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामध्ये माझ्या मुलीने दाखवलेला समजूतदारपणा आणि देशाप्रती असलेली तिची भावना पाहून आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो. माझी पत्नी व विशेषतः मुलगी माहीका या दोघींचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी समजूतदारपणे आणि सकारात्मकतेने या निर्णयाला साथ दिलीत, यासाठी मी ऋणी आहे. देशहित सर्वोपरि. जय हिंद! जय महाराष्ट्र!, असे अमित साटम यांनी म्हटले आहे.

दरम्यान या संपूर्ण निर्णयामध्ये सर्वात विशेष बाब म्हणजे १२ वर्षांच्या माहीकाने दाखवलेला समजूतदारपणा फार महत्त्वाचा आहे. इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेणे सोपे नाही. मात्र तिने देशाप्रती असलेले आपले कर्तव्य ओळखत या निर्णयाचा स्वीकार केला. यामुळे अमित साटम यांनी त्यांची पत्नी आणि मुलगी माहीका यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...