Prasad Lad : मराठा आंदोलकांच्या ईडी चौकशीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया

Prasad Lad : "कुठलाही विषय भांडून नाही, तर चर्चेने सुटला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 15 पैकी 13 मागण्या पूर्ण केल्या. दोन मागण्यान्याय प्रविष्ट आहेत. सातारा, कोल्हापूर गॅझेट आहे. आम्ही एजी, सॉलिसिटर जनरलचा सल्ला मागितला आहे"

Prasad Lad : मराठा आंदोलकांच्या ईडी चौकशीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया
Prasad Lad
| Updated on: Sep 22, 2026 | 1:54 PM

आमदार आणि भाजपं नेते प्रसाद लाड यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलकांच्या ईडी चौकशीवर भाष्य केलं. “आज मी आपल्या गणपती बाप्पाची आरती केली. महाराष्ट्राच्या जनतेला सुख, समृद्धी मिळावी. दुष्काळ न पडावा यासाठी प्रार्थना केली. फडणवीस सरकारकडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल यासाठी प्रार्थना केली” असं प्रसाद लाड म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही ते बोलले. “मनोज जरांगेंच्या विषयात संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी कम्युनिकेशन गॅप होती, जरांगे आणि चर्चा करणाऱ्यांमध्ये. ज्यामुळे सरकारपर्यंत त्यांचे प्रश्न पोहोचत नव्हते. सरकार जे करतय ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतं. त्यांनी मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही गोष्ट सोडवली” असं प्रसाद लाड बोलले.

“कुठलाही विषय भांडून नाही, तर चर्चेने सुटला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 15 पैकी 13 मागण्या पूर्ण केल्या. दोन मागण्यान्याय प्रविष्ट आहेत. सातारा, कोल्हापूर गॅझेट आहे. आम्ही एजी, सॉलिसिटर जनरलचा सल्ला मागितला आहे. हैदराबाद गॅझेटला हाय कोर्टात चॅलेंज झालय. SEBC ला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलय. अशा परिस्थितीत सातारा, कोल्हापूर गॅझेट जर दिलं, तर त्याचा परिणाम निश्चित हैदराबाद गॅझेटवर होऊ शकतो. मग मराठा समाजाचा बॅकलॉग भरुन काढणं कठीण जाईल” असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

मनोजदादांना विनंती केली की..

“मनोजदादांना विनंती केली की, वेळ द्या. त्या माध्यमातून आम्ही सल्ला घेतो. कोर्ट काय म्हणतय याचा निर्णय घेऊ. चार वैधता प्रमाणपत्र रद्दं झाली ती संपूर्णपणे कायदेशीर लढाई होती. कोर्टातलं काम आम्ही करु शकतो असं कोणालाही सांगू शकत नाही. त्यात एक पर्याय दिला. एक डिविजन कमिश्नर पातळीवर यंत्रणा तयार केली. त्यात जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर कोर्टात जाण्याआधी तिथे जाता येणार होतं. पण कोणीतरी त्याला छत्रपती संभाजी नगर कोर्टात चॅलेंज केलं” असं प्रसाद लाड म्हणाले.

शेवटी ते समाजासाठी लढतायत

“मराठा आरक्षण समितीच्या माध्यमातून एक गोष्ट मराठवाड्यासाठी केली. 9 कागदपत्रांऐवजी 41 कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. हैदराबाद गॅझेटियरनुसार मनोज जरांगे पाटील यांना जेवढं समाधान देता येईल, तेवढं आम्ही केलं. शेवटी ते समाजासाठी लढतायत. ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेतय” असं प्रसाद लाड म्हणाले.

मराठ आंदोलकांच्या ईडी चौकशीवर प्रसाद लाड काय बोलले?

मराठ आंदोलकांच्या ईडी चौकशीवर सुद्धा प्रसाद लाड बोलले. “यामध्ये कोणतही राजकारण कोणाचं देणं-घेणं नाहीय. जे अजय बारस्कर, खुणे म्हणून त्यांच्यासोबत काम करत होते, त्या कार्यकर्त्यांनी तक्रार केलीय. त्यांच्या वादात, भांडणात आम्हाला पडायचं नाहीय. ईडी, इन्कम टॅक्स जी काय चौकशी आहे ती होईल, त्यातून दूध का दूध, पाणी का पाणी होईल. मी मागे म्हटलं, तक्रार केली म्हणून ईडीने चौकशी केली असं होत नाही. डॉक्युमेंट चेक केली जातात. बँकिंग अहवाल घेतला जातो. ही एक प्रक्रिया आहे. सरकार ईडी चालवत नाही. ती स्वतंत्रपणे काम करणारी यंत्रणा आहे, यावर राजकीय लोकांनी भाष्य न केलेलं बर” असं प्रसाद लाड बोलेल.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us