AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे उचित नाही’, अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांना सुनावलं, पाहा नेमकं काय म्हणाले?

परभणी येथील वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्यांची हत्या झाली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तर भाजपने या आरोपांना खोडून काढले आहे. अशोक चव्हाण यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

'हे उचित नाही', अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांना सुनावलं, पाहा नेमकं काय म्हणाले?
अशोक चव्हाण आणि राहुल गांधी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 24, 2024 | 5:58 PM
Share

परभणीत हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत 35 वर्षीय वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या मृत्यूवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेवरुन पोलिसांवर गंभीर आरोप केला जातोय. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना इतकी मारहाण केली की त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. विशेष म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल परभणीत जावून भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सोमनाथ सूर्यवंशी हे दलित असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजप खासदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली का हे चौकशीनंतर स्पष्ट होईल. पण कोणी व्यक्ती एखाद्या समाजाचा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामून करण्यात आली असा निष्कर्ष चौकशी पूर्वी काढणे हे उचित नाही”, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर अशोक चव्हाण यांनी टीका केली.

अशोक चव्हाण यांची नाना पटोलेंवर खोटक टीका

“राहुल गांधी यांचा परभणी दौरा हा राजकीय होता आणि राजकीय दौऱ्याच्या माध्यतून त्यांनी राजकारण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे स्टेटमेंट दिले आहे. त्यात सत्यता नाही”, असं अशोक चव्हाण म्हणाले. “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय बोलले मला माहिती नाही, पण साकोलीच्या जनतेने त्यांची लायकी काय हे दाखवली आहे”, अशी खोचक टीका देखील खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील परभणीत जावून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन नेमकं काय काय घडलं होतं? याची माहिती जाणून घेतलं. यावेळी शरद पवारांनी सूर्यवंशी कुटुंबाला आरोपींवर कठोर कारवाई होईल, याची ग्वाही दिली.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा