भाजप आणि शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर, थेट शिदेंच्या दाैऱ्यावेळी भाजपा आमदारांनी..
शिंदे शिवसेना आणि भाजपामधील वाद पुढे येताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दाैऱ्यावर होते. यावेळी शिंदेंच्या या दाैऱ्याकडे भाजपाच्या आमदारांनी पाठ फिरवली. उलट एनसीपी शरद पवार गटाचे आमदार शिंदेंसोबत फिरत होते.

सोलापूर महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाचे अंतर्गत मतभेद आणखी वाढले आहेत. वाद टोकाला पोहोचताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 2 दिवसीय पंढरपूर दौऱ्यात भाजपचा एकही आमदार शिंदेंच्या भेटीसाठी आला नाही, एकनाथ शिंदे तब्बल दोन दिवसांच्या दाैऱ्यावर होते. पण शिंदेंच्या दाैऱ्याकडे भाजपाच्या आमदारांनी पाठिंबा फिरवला. याउलट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2 आमदार पुर्ण दौऱ्यात सोबत पाहायला मिळाले. युतीत असूनही विरोधी पक्षाचे आमदार शिंदेंसोबत फिरत होते पण भाजपाच्या आमदारांनी साधी भेटही दिली नसल्याने अंतर्ग वाद चव्हाट्यावर आला. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह एकाही आमदाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली नाही. जाणूनबुजून शिंदेंच्या दाैऱ्याकडे यांनी पाठ फिरवल्याचे सांगितले जाते.
सातारा जिल्हा बँक आणि सोलापूर जिल्हा बँके निवडणुकीतील विरोधी भूमिकेमुळे महायुतीत हे नाराजीनाट्य पाहायला मिळाल्याची चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे. या उलट माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या घरी एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते काही वेळ होते देखील.
आषाढी वारीत स्थानिक भाजप आमदार समाधान आवताडे वगळता एकही भाजप नेत्याने शुभेच्छा बॅनर देखील लावले नाही. भाजप आमदार समाधान आवताडे यांनीच फक्त एकनाथ शिंदे यांच्या आगमनाचे बॅनर लावले. इतर भाजपाच्या नेत्यांनी बॅनर लावणेही टाळल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नाराजीनाट्य आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसात शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील वाद पुढे येत आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपामधील वाद पुढे येत असला तरीही राज्यातील बडे नेते युतीत सर्वकाही अलबेल असल्याचे बोलत आहेत. विधानसभा शिक्षण मतदार संघ आणि पदवीधर शिक्षक संघ निवडणुकीत महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला होता. यावेळी काही ठिकाणी या वादामुळेच पराभवाचा सामना करण्याची वेळ आली होती. त्यातच आता सोलापूरमध्येही हेच चिन्ह बघायला मिळतंय.