पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीने होणार?; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी होणार असून या प्रकरणाचं सत्य बाहेर येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. (bjp raised questions to cm uddhav thackeray on pooja chavan suicide case)

पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीने होणार?; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल


रत्नागिरी: पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी होणार असून या प्रकरणाचं सत्य बाहेर येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीने होणार? कोणत्या यंत्रणेमार्फत होणार? असे सवाल भाजपने मुख्यमंत्र्ंयांना केले आहेत. (bjp raised questions to cm uddhav thackeray on pooja chavan suicide case)

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पूजा चव्हाण प्रकरणी काही प्रश्न उपस्थित करून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. पूजाच्या आत्महत्या प्रकरणी ज्या काही बाबी येत आहेत. त्या सर्वांची योग्य यंत्रणेकडून चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणाचं सत्य बाहेर काढणं ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी सरकारने अद्याप घेतली नसल्याचं दिसून येतं, असा आरोप भंडारी यांनी केला.

ऑडिओ क्लिपची चौकशी करा

पूजा चव्हाण प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात राज्यातील एका मंत्र्याचं नाव येत आहे. हे अत्यंत दुर्देवी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर आलंच पाहिजे. जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणात काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्याचीही सखोल चौकशी झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वत: पुढाकार घ्यावा. चौकशी कशा पद्धतीने होणार हे त्यांनी सांगायला हवं, पण अजून चौकशी कोणत्या यंत्रणेमार्फत होणार, कशा पद्धतीने होणार हे अद्याप जाहीर झालेलं दिसत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

सीआयडी चौकशी करा

पूजाच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तिच्या आजोबांनी केली आहे. सरकारनं CID सारख्या यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी पूजाच्या वसंतनगरमध्ये राहणाऱ्या आजोबांनी केली आहे.

‘तांत्रिक अडचणीमुळे गुन्हा दाखल नाही’

पूजा चव्हाण प्रकरणाला आज आठवडा होत आहे. या प्रकरणावर पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे. पूजा चव्हाण प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असल्याचं सांगतानाच कायदेशीर अडचणींमुळे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं. पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, काही कायदेशीर अडचणी असल्याने गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तसेच या प्रकरणातील दोन्ही तरुणांचे जबाब नोंदवण्यात आल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

आठदिवसापूर्वी केली आत्महत्या

पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी पुढं आली. तेव्हापासूनच संजय राठोड नॉटरिचेबल आहेत. (bjp raised questions to cm uddhav thackeray on pooja chavan suicide case)

संबंधित बातम्या:

संजय राठोड यांची हकालपट्टी करा, पूजा चव्हाण प्रकरणावरुन अतुल भातखळकर आक्रमक

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, एकनाथ शिंदे म्हणतात…

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

(bjp raised questions to cm uddhav thackeray on pooja chavan suicide case)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI