AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोणाचा? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं…

राज्यात महायुतीचं सरकार आल्यास मुखमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोणाचा? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
| Updated on: Nov 08, 2024 | 7:09 PM
Share

राज्यात येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यंदा राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही कडून देखील महाराष्ट्रात आमचीच सत्ता येणार याबाबत दावा केला जात आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे महायुतीचे प्रमुख घटक पक्ष आहेत. सध्या राज्यात महायुतीचं सरकार असून, एकनाथ शिंदे हे मुख्यंत्री आहेत. दरम्यान पुन्हा एकदा जर राज्यात महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार की फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले बावनकुळे? 

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे भाजपचा विजय हा खऱ्या अर्थाने नेतृत्वाचा विजय असतो, आमच्या जास्तीत जास्त जागा महायुती म्हणून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या जागा याव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. महायुतीचं सरकार यावं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कुठलीही चढाओढ नाही. आम्ही विकासाकरिता काम करतो आहोत, मुख्यमंत्रिपदासंदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. नाना पटोले हे सध्या शोले पिक्चरच्या असराणीच्या भूमिकेत आहेत, सगळे इकडे तिकडे गेले आहेत, त्यांच्यासोबत कोणी राहिलं नाही, त्यांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न धुळीस मिळालं आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून देखील त्यांनी निशाणा साधला.

खरगे यांना विचारायला पाहिजे की लाडकी बहिणी योजना चुकीची आहे का?, वीजबिल माफ केलं तेही चुकीचा आहे का?  ते सर्वच योजनेबद्दल चुकीचं आहे असं म्हणतात, आता महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवेल, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा