AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत राजकीय हालचाली वाढल्या… सकाळी सकाळीच बैठकांचं सत्र… भाजप व शिवसेनेमध्ये खलबतं… विधान परिषद जागा वाटपाचा तिढा सुटणार?

विधानपरिषद जागा वाटपासाठी भाजप व शिवसेनेमध्ये खलबते सुरू झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

मुंबईत राजकीय हालचाली वाढल्या... सकाळी सकाळीच बैठकांचं सत्र... भाजप व शिवसेनेमध्ये खलबतं... विधान परिषद जागा वाटपाचा तिढा सुटणार?
भाजप-शिवसेनामध्ये जागा वाटपाची खलबतंImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: May 23, 2026 | 10:56 AM
Share

BJP-Shivsena on Vidhan Parishad Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत रस्सीखेच सुरूच असल्याचे समजते. प्राथमिक चर्चेत काही जागांच्या अदलाबदलीविषयी चर्चा झाल्याचे समजते. तर आज शनिवारी सकाळीच विधानपरिषद जागा वाटपासाठी भाजप व शिवसेनेमध्ये खलबते सुरू झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. नंदनवन या शासकीय निवासस्थानी विधानपरिषद निवडणुकीच्या जागांवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

तीनही प्रमुख नेत्यांमध्ये बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये खलबतं सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला शासकीय निवासस्थानी, नंदनवन येथे पोहचले. विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. एकूण १७ जागांपैकी शिवसेनेने ६ ते ७ जागांवर दावा सांगितला आहे. सध्या भाजप १२, शिवसेना ३ व राष्ट्रवादी काँग्रेस २ या फॉर्म्युलावर प्राथमिक चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. पण शिवसेनेने अधिक जागांची मागणी केल्याची समजते. तीन जागांवर शिवसेना तयार नाही. यापूर्वीच्या निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केल्याने अधिक जागांची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

भाजप शिवसेनेला जास्त जागा सोडणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक राजकीय समीकरणांना महत्त्व असतं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. अनेक जण इतर पक्षातून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणाला मोठा धक्का न लावता भाजप शिवसेनेला जास्त जागा सोडणार का? असा मोठा सवाल आहे. तर सेनेला अधिकची जागा दिल्यास राष्ट्रवादी पक्ष सुद्धा अधिक जागेसाठी आग्रह धरण्याची शक्यता आहे. भाजपसमोर मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान आहे.

महायुतीत जागांची अदलाबदल?

ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपचा मोठा पेच आहे. शिवसेना दोन्ही ठिकाणी दावा सांगत आहे. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने पुण्यावर दावा केला आहे. याठिकाणी भाजपचे संख्याबळ अधिक आहे. अशावेळी पारंपारिक जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण यामुळे नाराजी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आवाहन महायुती समोर असेल. तीनही प्रमुख नेत्यांच्या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण याच आठवड्यात जागा वाटप करण्याचे महायुतीने ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ