
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून, सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. भाजपमध्ये झालेल्या या पक्षप्रवेशाचा शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. संजोग वाघेरे हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजोग वाघेरे यांचा भाजप प्रवेश हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. पुण्यातील बारामती गेस्ट हाऊसमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला होता, त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने शहरात मोठा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. सर्वपक्षीय 22 नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महापालिकेची निवडणूक आचारसंहिता सुरू झाली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेले पदाधिकारी
१) माजी महापौर उबाठा गटाचे नेते – श्री संजोगजी वाघेरे पाटील
२) माजी अध्यक्ष, स्थायी समिती – सौ. उषाताई वाघेरे
३) राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष – श्री प्रशांत शितोळे
४) राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते – श्री विनोद नढे
५) राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर – श्री प्रभाकर वाघेरे
६) माजी उपमहापौर – श्री राजू मिसाळ
७) उबाठा गटाचे नगरसेवक – श्री अमित गावडे
८) उबाठा गटाच्या नगरसेविका – सौ. मीनलताई यादव
९) श्री रवी लांडगे
१०) माजी नगरसेवक – श्री संजय नाना काटे
११) राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका – सौ. आशाताई सूर्यवंशी
१२) प्रविण भालेकर
१३) जालिंदर बापु शिंदे
१४) सचिन सानप
१५) दादा सुखदेव नरळे
१६) सदगुरु कदम
१७) समीर मासुळकर
१८) सुहास कांबळे
१९) कुशाग्र कदम
२०) अशोक मगर
२१) नागेश गवळी
२२) प्रसाद शेट्टी – माजी नगरसेवक.
२३) नवनाथ जगताप – माजी स्थायी समिती अध्यक्ष.
२४) प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर