पवारांवरील टीकेवरून ‘राष्ट्रवादी’ आक्रमक; भोसलेंना शहरात फिरू देणार नाही, युवक शहराध्यक्ष खैरे यांचा इशारा

भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. याबद्दल त्यांनी तातडीने जाहीर मागावी, अन्यथा भोसले यांना नाशिक शहरात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिला आहे.

पवारांवरील टीकेवरून 'राष्ट्रवादी' आक्रमक; भोसलेंना शहरात फिरू देणार नाही, युवक शहराध्यक्ष खैरे यांचा इशारा
अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नाशिक.


नाशिकः भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. याबद्दल त्यांनी तातडीने जाहीर मागावी, अन्यथा तुषार भोसले यांना नाशिक शहरात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविरोधात भाजपा अध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी आपली पातळी सोडत अतिशय हीन दर्जाची टीका सोशल मीडियावर केली. भोसले यांनी केलेली टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरण हाताळत असलेले अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोमधील अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधारातील पुरावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमासमोर आणल्यानंतर भाजपाला या प्रकरणात आगपाखड होण्याचे कारण नाही. मात्र, त्यांचा केवळ विरोधाला विरोध सुरू आहे. आपले पक्षप्रेम सिद्ध करून आपली वफादारी दाखविण्यासाठी लहान उंचीचे व्यक्तिमत्व असलेले तुषार भोसले यांनी सोशल मीडियाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करत तुषार भोसले यांच्या घरी समज देण्यासाठी गेले. परंतु ते भीतीपोटी घर सोडून फरार आहेत. त्यांनी आहे त्या ठिकाणावरून तातडीने जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना नाशिक शहरात फिरू न देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविरोधात भाजपा अध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी आपली पातळी सोडत अतिशय हीन दर्जाची टीका सोशल मीडियावर केली. या टीकेमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. आता भोसले यांनी जाहीर माफी मागावी.
– अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

इतर बातम्याः

ऐन दिवाळीच्या तोंडावर BOSCH ने नाशिकमध्ये 730 कामगार काढले; 530 जणांना सक्तीची ‘व्हीआरएस’

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरणः पुनमियाला जिल्हा व सत्र न्यायालयाचा तूर्तास दिलासा, सुनावणी चार आठवडे पुढे

साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; नाशिकमध्ये अशी रंगणार मैफल!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI