तुमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार तरी कोण? नाव न घेता भाजपच्या खासदराने उडवली पवारांची खिल्ली

जनतेला ही चित्र स्पष्ट होईल भविष्यात पक्षाचे नेतृत्व कोण करणार आहे, दिवाळीच्या सणामुळे जास्त झोप झाली आहे, त्यामुळे लोक स्वप्न बघत असाही टोला यावेळी भाजपच्या युवा खासदाराने लगावला आहे.

तुमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार तरी कोण? नाव न घेता भाजपच्या खासदराने उडवली पवारांची खिल्ली
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 8:40 PM

अहमदनगर : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवाळीनिमित्ताने अजित पवार यांना मुख्यमंत्री पदावर पाहायची इच्छा व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे युवा खासदार सुजय विखे यांनी रोहित पवारांच्या विधानावरुन राष्ट्रवादी कॉँग्रेसवर निशाणा साधला आहे. सुजय विखे यांनी म्हंटले, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न 35-40 वर्षांनी पूर्ण होईल, प्रत्येक पक्षाला आत्मविश्वास असणे चांगलं आहे. मला मात्र मला आनंद अधिक होईल, जेव्हा की त्यांनी मुख्यमंत्री पदाचे नाव देखील जाहीर करावं. याशिवाय विखे यांनी, पक्षाला नेतृत्व कोण देणार ? आणि मुख्यमंत्री कोण होणार ? हे झाल्यानंतर जनतेला कळायला नको आधीच स्पष्ट करावे असे म्हंटले आहे.

यानंतर पुढे भाजपचे खासदार सुजय विखे म्हणाले, तुमचा पक्ष सर्वात मोठा झाला आहे, मग भांडण्यापेक्षा आजच नाव जाहीर केलं तर जास्त आनंद होईल.

जनतेला ही चित्र स्पष्ट होईल भविष्यात पक्षाचे नेतृत्व कोण करणार आहे, दिवाळीच्या सणामुळे जास्त झोप झाली आहे, त्यामुळे लोक स्वप्न बघत आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान स्वप्न पाहायला बंदी नाही, स्वप्न पहावी पण त्यांचे स्वप्न 35-40 वर्षांनी पूर्ण होईल असा टोला देखील सुजय विखे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला लगावला आहे.

रोहित पवार यांनी मुख्यमंत्री पदी अजित दादांना बघायची इच्छा बोलून दाखवली होती, त्यावरून भाजपचे खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे.

सूजय विखे यांचा मुख्यमंत्री पदी आणि पक्ष नेतृत्व कोणाचं असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना थेट डिवचले आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.