BMC Election 2026 Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग? मुंबई पालिकेचा धक्कादायक एक्झिट पोल; सत्ता कोणाला?
राज्यात एकूण 29 महापालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निकालाचा अंदाज समोर आला आहे.

BMC Election Exit Poll 2026 : राज्यात एकूण 29 महापालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निकालाचा अंदाज समोर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुंबईची महापालिका निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी होती. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता मतदानाची प्रक्रिया संपली आहे. त्यानंतर आता वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे. परंतु आता ठाकरे यांच्या याच सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता व्यक्त केली जात जात आहे. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीची सत्ता येणार असे एक्झिट पोलचे आकडे सांगत आहेत. अर्थात प्रत्यक्ष मतमोजणी अजून बाकी आहे. परंतु एक्झिट पोलच्या या अंदाजामुळे भाजपात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजात कोणाला किती जागा?
राज्यात महापालिका निवडणुकीत कोणाची सत्ता येईल हे सांगणारे वेगवेगळे एक्झिट पोल समोर आले आहेत. यात ‘पोल ऑफ पोल’च्या सर्वेक्षणानुसार मुंबई महापालिकेत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा विजय होईल. या दोन्ही पक्षांना मिळून 138 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकूण 62 जागा मिळू शकतात. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीला एकूण 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. यासह अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले सात उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.
Municipal Election 2026
Kolhapur Election Exit Poll 2026 : कोल्हापूरमध्ये महायुतीची सत्ता...
BMC Election Exit Poll 2026 : ठाकरे बंधूंसह पवारांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का...
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
अभिनेते मकरंद देशपांडेंकडून जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन
Nashik Election Poll Percentage : नाशिक महापालिकेसाठी 4.30 वाजेपर्यंत 41 टक्के मतदान
Nanded Election Poll Percentage : नांदेड महापालिकेसाठी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 41.65 टक्के मतदान
एक्सिस माय इंडिया पोल पोलनुसार कोणाची सत्ता
एक्सिस माय इंडिया पोलनुसार मुंबई महापालिकेत भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेला सत्ता मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षाच्या युतीला एकूण 131-151 जागा मिळू शकतात. तर ठाकरे- मनसे आणि शरद पवार यांच्या युतीला 58 ते 68 जागा मिळू शकतात. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला 12 ते 16 जागा मिळू शकतात. यासह 6 ते 12 अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात. यासह भाजपाला 42 टक्क्यांपेक्षा अधिक मतं पडण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ठाकरेंच्या आघाडीला 32 टक्के मते मिळणार असे या अंदाजात सांगण्यात आले आहे. तर इतरांना एकूण 13 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
(टीप- हा फक्त एक्झिट पोलचा अंदाज आहे. प्रत्यक्ष मतमोजणी बाकी आहे. 16 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाईल.)
