
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर व्हायला सुरूवात झाली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील सुरुवातीचे निकाल समोर आले आहेत. मुंबईत भाजप आणि शिवसेनेला चांगले यश मिळताना दिसत आहे. मात्र ठाकरे बंधुंकडून भाजपला कडवी टक्कर मिळताना पहायला मिळत आहे. अशातच आता काही निकाल समोर आले आहेत.
प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपाच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर या भाजपात दाखल झाल्या होत्या. त्यापूर्वी त्या शिवसेना ठाकरे गटात होत्या. आता त्यांनी शानदार विजय मिळवला आहे. तेजस्वी घोसाळकर यांना 16,484 मते मिळाली आहेत. तर त विरोधी धनश्री कोळगे यांना 5759 मते मिळाली.
प्रभाग क्रमांक 165 मध्ये राष्ट्रवादीचे बडे नेते नवाब मलिक यांना धक्का बसला आहे. नवाब मलिक यांचे बंधू कॅप्टन मलिक यांचा पराभव झाला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे अश्रफ आजमी विजयी झाले आहेत. अशरफ आजमी यांना 7782 मते मिळाली तर भाजपच्या रुपेश नारायण पवार यांना 7227 मते मिळाली. तसेच राष्ट्रवादीच्या कॅप्टन मलिक यांना केवळ 4863 मते मिळाली आहे.
प्रभाग क्रमांक- 50 – भाजपचे विक्रम राजपूत विजयी
प्रभाग क्रमांक – 33 काँग्रेसचे मोईन सिद्दिकी विजयी
प्रभाग क्रमांक – 1 शिवसेनेच्या रेखा यादव विजयी
प्रभाग क्रमांक – 135 भाजपचे नवनाथ बन विजयी
प्रभाग क्रमांक – 215 भाजपचे संतोष ढोले
प्रभाग क्रमांक – 214 भाजपचे अजय पाटील विजयी
प्रभाग क्रमांक – 19 भाजपचे प्रकाश तावडे विजयी
प्रभाग क्रमांक – 207 भाजपचे रोहिदास लोखंडे विजयी
प्रभाग क्रमांक – 123 शिवसेना ठाकरे गटाचे सुनील मोरे विजयी
प्रभाग क्रमांक – 50 भाजपचे विक्रम राजपूत विजयी
प्रभाग क्रमांक – 20 भाजपचे दीपक तावडे विजयी
प्रभाग क्रमांक – 182 शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य विजयी
प्रभाग क्रमांक – 87 शिवसेना ठाकरे गटाच्या पूजा महाडेश्वर विजयी
प्रभाग क्रमांक – 73 शिवसेना ठाकरे गटाच्यालोना रावत विजयी
प्रभाग क्रमांक – 145 खैरुनिसा हुसेन एम आय एम विजयी