
आमच्याकडे मजबूत उमेदवारांची रीघ लागली आहे . मुंबईत महायुती 150 हून अधिक जागा जिंकेल , महायुती मजबूत आहे – असं आशिष शेलार म्हणाले.
नागपूर – भाजप मधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपचे राजू नगुलवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत एबी फार्म घेतला. आता ते प्रभाग 32 मधून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर चारच्या पॅनल सह निवडणूक लढवणार आहेत. राजू नगुलवार हे आधी राष्ट्रवादी मध्ये होते मात्र त्यांनी भाजप आमदार मोहन मते यांच्यावर विश्वास ठेवत 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता .
पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेने युती तुटल्याचा जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पार्टीतील नाराज उमेदवार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भारतीय जनता पार्टीत अनेक जण उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहेत. नाराज असलेल्यांना शिंदेंच्या शिवसेनेचा पर्याय दिसत आहे.
काँग्रेस 30 ठाकरे गट 30 राष्ट्रवादी शरद पवार गट 14 जागा…सेनेचा कोट्यातून मनसेला जागा मिळणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली आहे.. भारतीय जनता पार्टी तर्फे उमेदवारी डावलण्यात आल्याने निष्ठावंतांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म घेतले..
अमरावतीत शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. सर्व 87 जागेसाठी एबी फॉर्म वाटप करणे सुरू झालं आहे. एबी फॉर्म घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी जमली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सन्मानजगक जागा न मिळाल्याने शिवसेना शिंदे गट महायुती मधून बाहेर पडला आहे. आता संपूर्ण 87 जागा शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढत आहे.. त्यासाठी माजी आमदार शिवसेना नेते अभिजीत अडसूळ हे उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करत आहे… त्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे,
संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर भाजपाची महत्त्वाची बैठक सुरू आहे. मंत्री अतुल सावे यांच्या निवासस्थानी अतुल सावे व भागवत कराड, संजय केनेकर व किशोर शितोळे यांच्यात बैठक सुरू आहे. बैठकीत भाजपच्या वतीने महानगरपालिकेसाठी राजकीय रणनीती ठरवली जात आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीतील बिघाडी अखेर समोर आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात युतीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली बोलणी अखेर फिस्कटली आहेत. जागावाटपाचा तिढा न सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आता स्वबळाचा नारा दिला असून पक्षाकडून ५५ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, काँग्रेसची आरपीआय (खोरिपा) सोबतची युतीची शक्यताही मावळल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता एकला चलो रे ची भूमिका घेत महानगरपालिकेच्या सर्व ६६ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे चंद्रपुरात आता बहुरंगी लढत पाहायला मिळणार असून काँग्रेसच्या या निर्णयामुळे राजकीय गणिते बदलली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली असून, यामध्ये सात दुकाने जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेत दुकानांमधील सामानाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (३० डिसेंबर) शेवटचा दिवस आहे. सकाळपासूनच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, उमेदवारांनी वेळेचे बंधन पाळणे अत्यंत आवश्यक आहे. नियमानुसार, मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC) अर्ज स्वीकारण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. तर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगरसह इतर सर्व महानगरपालिकांसाठी अर्ज भरण्याची वेळ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत देण्यात आली आहे. ऐनवेळी होणारी तांत्रिक अडचण किंवा गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांना वेळेत पोहोचण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेमध्ये मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. काल दिवसभरात पुण्यातील ६० हून अधिक इच्छुकांना शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते, ज्यामुळे सेना स्वबळावर लढणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, रात्री उशिरा मुंबईतून वरिष्ठांचा युतीचा निरोप आल्याने हे सर्व फॉर्म्स तातडीने माघारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता पुणे महापालिकेत शिवसेना आणि भाजप पुन्हा युती करूनच रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, हे उपमुख्यमंत्री अजित पवार नसून प्रभाग क्रमांक २५ (ड) मधून अजित पोपट पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर हा अर्ज भरला असून, त्यांना पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ मिळाल्यास ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असू शकतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि उमेदवार अजित पवार यांच्या नावातील साधर्म्यामुळे सध्या संपूर्ण शहरात अजित पवार पिंपरीची निवडणूक लढणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवसेनेत सध्या अंतर्गत राजकीय नाट्य आणि नाराजीचा मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे. काल शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आपल्या समर्थकांसह संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर भेट दिल्यानंतर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या घडामोडींमुळे व्यथित होऊन माजी महापौर विकास जैन यांनी आगामी निवडणूक न लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या पक्षात शिस्त राहिलेली नाही. ही सुरू असलेली पद्धत आपल्याला मान्य नसल्याची तीव्र भावना जैन यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मंत्री उदय सामंत काही वेळात बैठकीच्या ठिकाणी पोहचणार. मंत्री उदय सामंत येण्यापूर्वी शिवसैनिकांनी केली मोठी गर्दी.. पुण्यातील हॉटेलमध्ये पार पडणार शिवसेनेची बैठक… बैठकीला शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे आले आहेत..
1992 अर्जाची झाली विक्री.. भाजपातर्फे चार जणांनी दाखल केले अर्ज. या दोन माजी नगरसेवकांचा समावेश.अद्यापही भाजपा तर्फे अंतिम यादी जाहीर न झाल्याने संभ्रम. अनेक आजी-माजी नगरसेवक आणि माजी महापौरांचा पत्ता कट. शेवटच्या क्षणाला काही उमेदवारांना भाजप एबी फॉर्म देऊन उमेदवारी देण्याच्या तयारी..
शिंदे शिवसेना व दादाची राष्ट्रवादी नांदेड महानगरपालिकेसाठी दहा प्रभाग एकत्र लढण्याची तयारी. युतीवरून शिंदे गटात फूट, दोन आमदार राष्ट्रवादी सोबत तर एक आमदार स्वतंत्र उमेदवार देणार. दादाच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील व आमदार आनंद पाटील बोंढारकर यांचे मनोमिलन तर शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर दहा प्रभागात स्वतंत्र उमेदवार देणार असल्याची माहिती
04 जानेवारी पर्यंत मंदिराच्या वेळेत बदल. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक त्रंबकेश्वर मध्ये दाखल. भाविकांची गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर देवस्थानचा निर्णय. नाताळ व नवीन वर्षाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांची माहिती
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी 125 शरद पवारांची 40 जागा लढणार. पॅनल निवडून येण्यास सोपे जाण्यासाठी अजित पवारांचे तीन उमेदवार आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा एक उमेदवार प्रत्येक प्रभागात असणार. राजकीय अस्तितव टिकवण्यासाठी प्रत्येक प्रभागात आपला अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीची रणनीती..
चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती साठी सुरू असलेली बोलणी फिस्कटली. राष्ट्रवादी काँग्रेस 40 जागांवर देणार उमेदवार तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील युती निश्चित, भाजप चंद्रपूर महानगरपालिकेत 66 पैकी 58 जागांवर निवडणूक लढणार तर शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या 8 जागा, मात्र भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर न करता उमेदवारांना झोन कार्यालयात निवडणूक अर्ज भरण्यासाठी बोलवणार आणि त्याच ठिकाणी एबी फॉर्म मंडळ अध्यक्ष नेऊन देणार
पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. कलम 17 कायमचं रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी कलम 17 नुसार, वांगणी-शेलु इथं सरकारने दिलेली घरं जर कामगाराने नाकारली, तर त्याला पुढे कधीही घर मिळण्याचा हक्क संपायचा. आता हा नियम पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. यामुळे कामगारांना आवडेल ती जागा निवडण्याची आणि घर मिळवण्याची संधी कायम राहील.
सुधारित शासन निर्णय मुंबईतील लाखो गिरणी कामगारांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता कामगारांना मुंबई शहरातच हक्काची घरे मिळतील. मुंबईत गिरणी कामगारांची मते निर्णायक आहेत.
डोंबिवलीत निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. फडके रोड ,एच प्रभाग आणि पूर्वेतील जी आणि एफ प्रभागसह निवडणूक कार्यालयांजवळील रस्ते सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत बंद राहतील. केडीएमसी निवडणूक पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील प्रभाग कार्यालयांजवळ वाहतुकीवर निर्बंध आहे. आज सकाळी ९ ते दुपारी ४ वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
डोंबिवली पश्चिमेतील एच प्रभाग आणि पूर्वेतील जी आणि एफ प्रभाग कार्यालय परिसर प्रभावित आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. ठाकुर्ली–फडके रोड–गणेश मंदिर मार्गावर काही प्रवेश पूर्णपणे बंद तर पी. पी. चेंबर्स, सुनीलनगर, उमेशनगर परिसरात प्रवेशबंदी आणि पर्यायी रस्ते सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी 31 डिसेंबर रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू राहणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
पुणे- दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 125 जागांवर तर 40 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष लढणार आहे. जिजाई बंगल्यावरती उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर विकास जैन नाराज असल्याची माहिती आहे. निवडणूक लढवणार नसल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. एकूणच घडत असलेल्या शिवसेना पक्षातील घडामोडीवर नाराज असल्याचं कळतंय. विकास जैन 2001-2002 मध्ये शिवसेनेचे महापौर होते. काल जागा वाटपावरून संजय शिरसाट यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त नाराजी केली होती.
देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२९ वर आहे. घाटकोपर आणि वांद्रे इथे एक्युआय १५७ पर्यंत पोहोचलाय. त्यासोबतच बोरीवली, चकाला , चेंबूर, देवनार, मालाड, दादार आणि कुलाबा यांसारख्या ठिकाणी प्रदूषण जास्त आहे. लहान मुले आणि वयोवृद्धांना याचा फटका बसतोय.
मलकापूरचे काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त नगराध्यक्ष अतीक जवारीवाला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर काढण्यात आलेल्या जल्लोष रॅलीत नोटा उधळल्याने अतिक जवारीवाला यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना विभाग क्रमांक 2 चे विभागप्रमुख लालसिंह राजपुरोहित यांनी शिवसेनेतून राजीनामा दिला. शिवसेना विभागप्रमुख लालसिंग राजपुरोहित यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. लालसिंह राजपुरोहित यांनी त्यांची पत्नी भाग्यलक्ष्मी यांना वॉर्ड क्रमांक 31 मधून काँग्रेसची उमेदवारी दिली. लालसिंह राजपुरोहित हे शिवसेनेचे विभागप्रमुख होते, पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमध्ये सामील झाले.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना सर्वच प्रमुख नेत्यांनी आघाडी- युतीसाठी रात्री उशिरापर्यंत चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवलं. मुंबई महापालिकेसाठी कॅांग्रेस – वंचितची आघाडी वगळता राज्यातील सर्व २९ महापालिकांमध्ये शेवटपर्यंत जागावाटपाचा घोळ सुरु होता. एका जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार असल्याने नाराजी दूर करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची कसरत सुरू होती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रात्री उशिरा जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आलं. मुंबईत भाजप १३७ तर शिवसेना शिंदे गट ९० जागा लढवणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९५ ते १०० जागांचा आग्रह धरला होता. तर भाजपने १४० जागा लढवण्याचा निश्चय केला होता. भाजप शिवसेनेत जोरदार रस्सीखेच झाल्यानंतर जागावाटपाचं सूत्र अखेर निश्चित करण्यात आलं. यासह राज्यातील, देशविदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.