अखंड रेल्वेचे दोन भाग झाले, कपलिंग बेरिंग तुटली आणि जे काही समोर आलं ते पाहून धक्काच बसेल

मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वेचे दोन भाग झाल्याने जणशताब्दी एक्सप्रेसमधील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. सुदैवाने धावत्या रेल्वेत ही घटना घडली नाही.

अखंड रेल्वेचे दोन भाग झाले, कपलिंग बेरिंग तुटली आणि जे काही समोर आलं ते पाहून धक्काच बसेल
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 4:21 PM

मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मनमाड (नाशिक) : मनमाड रेल्वे स्थानकावर आज मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. मनमाडहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या डब्याची कपलिंग बेअरिंग तुटली होती. त्यामुळे अखंड रेल्वेचे दोन भाग झाले होते. मुंबईच्या दिशेने निघालेल्या रेल्वेची मध्यभागी एका डब्याजवळ कपलिंग बेअरिंग तुटली होती. त्यात रेल्वे पुढे धावण्यास सुरुवात झाली आणि अर्धा भाग पुढे निघून गेला होता. त्यामुळे रेल्वेचा अर्धा भाग मनमाड रेल्वेस्थानकावर राहिला आणि अर्धा भाग पुढे निघून गेला होता. काही क्षणातच ही बाब लक्षात आल्याने पुन्हा पुढे गेलेली रेल्वे मागे आणण्यात आली. पुन्हा कपलिंग बेअरिंग जोडण्यासाठी बराच वेळ गेला. कपलिंग बेअरिंग जोडून पुन्हा रेल्वे मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. साधारण तासभर हा सगळा गोंधळ सुरू होता. अचानक आर्धी रेल्वे मागेच राहून गेल्याने प्रवासी वर्गात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. साधारणपणे तासभर रेल्वे उशिरा निघल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.

मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वेचे दोन भाग झाल्याने जणशताब्दी एक्सप्रेसमधील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती.

याबाबतचे व्हिडिओ समोर आले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करत तातडीने कपलिंग बेअरिंग बसविण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

रेल्वे स्थानकावर तुटण्या ऐवजी हीच कपलिंग धावत्या स्थितीत तुटली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा आता नाशिक जिल्ह्यात होऊ लागली आहे.

रेल्वेचे अपघात समोर आल्यानंतर वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जातात, मात्र आजची घटना बघतली तर कपलिंग बेअरिंग तूटून ही घटना घडली होती. सुदैवाने यामध्ये कुठलीही हानी झालेली नाही.

रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या ही बाब तात्काळ लक्षात आल्याने त्यांनी जोर जोरात ओरडण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे चालकाच्या ही बाब तात्काळ लक्षात आली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.