उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू, 11 जण जखमी, मृताच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर

उल्हासनगरात एका इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळत आल्याची दुर्घटना घडली आहे (Building slab collapsed in Ulhasnagar).

उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू, 11 जण जखमी, मृताच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर
उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 7:40 PM

ठाणे : उल्हासनगरात एका इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळत आल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातील मोहिनी पॅलेस इमारतीत आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या इमारतीत 9 फ्लॅट आणि 8 दुकानं होती. इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आला (Building slab collapsed in Ulhasnagar).

इमारतीतून 11 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढलं

या घटनेनंतर अग्निशमन दलासह ठाणे महापालिकेच्या टीडीआरएफ आणि एनडीआरएफने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. या इमारतीतील 11 जणांना अग्निशमन दलाने जखमी अवस्थेत बाहेर काढलं. तर टीडीआरएफने ढिगाऱ्याखाली दबलेल्या 4 जणांना मृतावस्थेत बाहेर काढलं. या घटनेची माहिती मिळताच खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी घटनास्थळी धाव घेतली (Building slab collapsed in Ulhasnagar).

मृतकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची शासकीय मदत दिली जाणार असून जखमींवर श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून उपचार केले जाणार असल्याची माहिती यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. तसेच कमी एफएसआयच्या समस्येमुळे उल्हासनगरात क्लस्टर योजना लागू होऊ शकत नसली, तरी पुनर्विकास आणि नियमितीकरण प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती शिंदेंनी दिली. तर उल्हासनगरातील सर्व धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश देत असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.