AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डाव्या हातात हिरव्या बांगड्या, उजव्या हातात काळा दोरा… ती कोण होती? शिर नसलेलं धड… AI इमेजद्वारे शोध सुरू

बुलढाणा जिल्ह्यातील शिरविहीन मृतदेहाचे गूढ ४५ दिवसांनंतरही कायम आहे. जळगाव जामोद येथे सापडलेल्या तरुणीच्या धडाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी AI इमेज तयार केली आहे. डाव्या हातात हिरव्या बांगड्या, उजव्या हातात काळा दोरा अशा वर्णनाची ही तरुणी कोण, याचा शोध सुरू आहे.

डाव्या हातात हिरव्या बांगड्या, उजव्या हातात काळा दोरा... ती कोण होती? शिर नसलेलं धड... AI इमेजद्वारे शोध सुरू
सांकेतिक फोटोImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 09, 2026 | 4:52 PM
Share

बुलढाणा जिल्हा सध्या एका प्रकरणाने अधिक गाजत आहे. एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचा मृतदेह सापडला. पण फक्त धड सापडलं. तिचं शिर सापडलंच नाही. डोकंच न सापडल्याने या तरुणीची ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे ही तरुणी कोण आहे? तिचा खून कोणी केला? असे सवाल प्रत्येकजण करत आहे. तर या तरुणीचा शोध घेण्यासाठी आता एआयच्या मदतीने तिच्या चेहऱ्याची इमेज तयार करण्यात आली आहे. त्यावरून या तरुणीचा शोध घेतला जात आहे. तसेच या तरुणीची माहिती देणाऱ्यासाठी पोलिसांनी रोख रकमेचं बक्षीसही जाहीर केलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातल्या राजुरा शिवारातील शिरविरहित बनवट हत्याकांड प्रकरणातील मृतक मुलीची ओळख अद्यापही पटलेली नाही. आज या प्रकरणाला जवळपास 45 दिवस उलटून गेलें तरीही मृत मुलगी नेमकी कोण? कुठली? याचा तपास लावण्यास बुलढाणा पोलिसांना अपयश आले आहे. या सगळ्या बाबींचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते काल अमरावती दौऱ्यावर आले होते. मृत मुलीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावर सापडलेल्या मृतदेहावरून एक एआय इमेज तयार केली आहे आणि या एआय इमेजच्या माध्यमातून शोध घेणे सुरू आहे.

आशा वर्करला सूचना

जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन पोलीस पाटील आशा वर्कर या सगळ्यांना पोलिसांनी शोध घेण्याची सूचना सुद्धा केली आहे. तसेच माहिती देणाऱ्यास 50 हजार रुपयांचा बक्षीस सुद्धा देण्याचं जाहीर केलेलं आहे. मात्र 45 दिवसानंतरही अद्याप मृत मुलगी कोण? याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे बुलढाणा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे.

काय घडलं होतं?

जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या मुलीचा हत्याकांडाने आता थेट राज्याच्या गृहविभागाचे लक्ष वेधले आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मृतदेहाची ओळख पटलेली नसताना तपासाचा गोंधळ, नंतर कथित मृत व्यक्तीच जिवंत असल्याचे समोर येणे आणि बनावट तपासाचे आरोप यामुळे बुलढाणा पोलिसांची विश्वासार्हता महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही चर्चेचा विषय ठरली. तब्बल नऊ अधिकारी आणि 26 अंमलदारांची टीम तपासात असतानाही मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही, ही बाब धक्कादायक मानली जात आहे.

तरुणीचं वर्णन आलं समोर

मृत तरुणी अंदाजे 20 ते 30 वर्षाची आहे. गव्हाळ सावळ्या रंगाची आहे. या तरुणीच्या डाव्या हातात हिरव्या बांगड्या, उजव्या हातात काळा दोरा होता. तिने गुलाबी रंगाची बो असलेली फ्लॅट सँडल घातलेली होती. या मुलीची ओळख पटवून देणाऱ्यास 50 हजार रुपये रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच माहिती देणाऱ्याची माहिती गुप्त ठेवली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार