AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana | बुलडाणा की बुलढाणा? गोंधळ नको, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट करून सांगितलं… वाचा सविस्तर!

बुलढाणा जिल्ह्याच्या नावात अनेकदा घोळ होत असल्याने जन्मदाखले, आधार कार्ड, टीसी, उत्पन्न किंवा इतर महत्त्वाच्या कागदपत्रांवरही जिल्ह्याचं नाव लिहिताना दोन प्रकारे लिहिले जात होते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या चर्चांना विराम देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Buldhana | बुलडाणा की बुलढाणा? गोंधळ नको, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट करून सांगितलं... वाचा सविस्तर!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 16, 2022 | 12:58 PM
Share

बुलढाणाः राज्यातील काही जिल्ह्यांच्या नामांतरावरून (City Name change) वाद सुरु असतानाच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याचं नाव लिहिण्यावरूनच गोंधळ उडाल्याची स्थिती दिसते. बुलडाणा (Buldana) की बुलढाणा, यापैकी नेमकं काय लिहायचं यावरून अनेक दिवसांपासूनचा वाद आहे. विविध सरकारी कार्यालयांमध्येही हा गोंधळ पहायला मिळतो. त्यामुळे सामान्य नागरिकदेखील द्विधा मनःस्थितीत असता. मात्र देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांमार्फतच या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर देण्यात आलंय. तसेच इथून पुढे जिल्ह्याचं किंवा शहराचं नाव लिहिताना बुलढाणा असंच लिहावं, अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांचाही गोंधळ उडणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नावात घोळ का झाला?

इंग्रजांच्या काळात जिल्हा मुख्यालय झालेल्या भिलठानाचे कालांतराने नामकरण झाले. जिल्ह्याच्या गॅझेट मध्ये सुद्धा जिल्हा मुख्यालयाचा बुलढाणा असाच उल्लेख आहे… अनेकदा शासकीय व्यवहार मध्ये ‘ ढा ‘ च वापरला जातो… मात्र काही ठिकाणी कालांतराने नावात अपभ्रंश होत गेले आणि ढा ऐवजी डा झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात रंगरंगोटी, डागडुजी करण्यात आली. त्यावेळीसुद्धा बुलडाणा ऐवजी आता बुलढाणा लिहिण्यात आले. यातही विशेष म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावरसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा.. असा बदल करण्यात आला.. माहितीनुसार गॅझेट मध्येही बुलढाणा असा उल्लेख असल्याचे प्रसाशकीय सूत्रांनी सांगितले… यामुळे किंचित बदल झाल्याचे सांगून आता अनेक पत्रव्यवहारामध्ये बुलढाणा असा उल्लेख करण्यात येत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

चर्चांना विराम मिळणार…

बुलढाणा जिल्ह्याच्या नावात अनेकदा घोळ होत असल्याने जन्मदाखले, आधार कार्ड, टीसी, उत्पन्न किंवा इतर महत्त्वाच्या कागदपत्रांवरही जिल्ह्याचं नाव लिहिताना दोन प्रकारे लिहिले जात होते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या चर्चांना विराम देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यलयांमध्ये जिल्ह्याच्या नावात बदल करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बोर्डावरही हा बदल ठळकपणे जाणवतोय. त्यामुळे ब्रिटिशांच्या काळातील भिलठाणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांचा यापुढे गोंधळ उडणार नाही, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाडा आणि दक्षिणेकडे दळणवळणासाठी विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्याचे महत्त्व आहे. आता नावातील गोंधळ दूर झाल्याने प्रशासकीय कामकाजही अधिक सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय.

महाराष्ट्र टुरिझम ट्विटरवर ‘संभाजीनगर’

बुलढाण्याच्या नावात गोंधळ असतानाच राजकीय पक्षांच्या अजेंड्यानुसार, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांचं नामांतर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्य सरकारने संभाजीनगर नावाला मंजुरी दिलेली असून केंद्र सरकारतर्फे यावर निर्णय होणे बाकी आहे. मात्र तत्पुर्वीच महाराष्ट्र पर्यटन संचलनालयाच्या ट्विटर हँडलवर संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आल्याने औरंगाबादेत नामांतरविरोधी नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.