Aurangabad | राज्याच्या पर्यटन संचलनालयाकडून औरंगाबादच्या नामांतराची घाई, महाराष्ट्र टुरिझम ट्विटर हँडलवर ‘संभाजीनगर’चा उल्लेख!

खासदार इम्तियाज जलील यांनीदेखील शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयाविरोधात लवकरच कोर्टातील आणि रस्त्यावरील लढाई लढणार असल्याचा इशारा दिला आहे.

Aurangabad | राज्याच्या पर्यटन संचलनालयाकडून औरंगाबादच्या नामांतराची घाई, महाराष्ट्र टुरिझम ट्विटर हँडलवर 'संभाजीनगर'चा उल्लेख!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 10:17 AM

औरंगाबादः औरंगाबाद शहराच्या नामांतराची (Aurangabad name change) प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाही राज्याच्या पर्यटन (Maharashtra Tourism) संचलनालयाला औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याची घाई झालेली दिसतेय. पर्यटन संचलनालयाच्या ट्विटर हँडलवर शहराच्या नावाचा उल्लेख करताना संभाजीनगर (Sambhajinagar) असा करण्यात आला आहे. त्यामुळे नामांतर विरोधी नेते आणि संघटनांची तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. राज्याच्या पर्यटन संचलनालयाचे महाराष्ट्र टुरिझम या नावाने ट्विटर हँडल आहे. यावर दौलताबाद अर्थात देवगिरी किल्ल्याची माहिती देताना औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. शहरातील अनेक खासगी आस्थापनांनी तर विविध ठिकाणी संभाजीनगर असा उल्लेख करणे सुरु केले आहे. मात्र सरकारी विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही पूर्ण नामांतर प्रक्रिया झालेली नसताना अशा प्रकारे उल्लेख केल्याने विविध समाज आणि संघटनांचा रोष ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे उल्लेख?

महाराष्ट्र टुरिझम या ट्विटर हँडलवरून राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती तसेच वैशिष्ट्य सांगितले जाते. काल 10 ऑगस्ट रोजी या अकाउंटवरून औरंगाबाद शहरातील दौलताबाद किल्ल्याविषयीचं ट्विट टाकण्यात आलंय.. संभाजीनगरमधील देवगिरी किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असून पर्यटकांना इतिहासात डोकावून पाहण्यासाठी आणि आपल्या समृद्ध वारशाबद्दल जाणून घेण्यासाठी योग्य ठिकाणी आहे. आपण या पर्यटन स्थळाला भेट दिली असेल तर त्याविषयीच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा… टुरिझमच्या ऑफिशियल अकाउंट वरून शहराच्या नावाचा बदल करण्यात आल्याने याला नामांतर विरोधी संघटनांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

गूगल मॅपनेही केला होता बदल

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने संभाजीनगर नामांतराचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर गूगल मॅपवरदेखील पूर्ण प्रक्रिया होण्यापूर्वीच नामांतराची घाई केली होती. गूगल मॅपवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख दिसत होता. शहरातील सामान्यांपासून राजकीय नेते आणि संघटनांमध्येही याची जोरदार चर्चा झाली होती. नामांतरविरोधी संघटना तसेच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर गूगल मॅपवरून संभाजीनगर हा उल्लेख बदलण्यात आला.

कायद्याने लढाई लढणार…

महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेला संभाजीनगरचा प्रस्ताव एकनाथ शिंदे सरकारने आधी रद्द केला. त्यानंतर शिंदे सरकारने पुन्हा या प्रस्तावाला मंजुरी दिली. आता केंद्र सरकारची मंजुरी येणे अद्याप बाकी आहे. तत्पुर्वी ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी नामांतरविरोधी संघटना कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहे. खासदार इम्तियाज जलील यांनीदेखील शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयाविरोधात लवकरच कोर्टातील आणि रस्त्यावरील लढाई लढणार असल्याचा इशारा दिला आहे.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.