AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete : मराठा आरक्षणाचा चेहरा हरपला, लोकनेते विनायक मेटे यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

Vinayak Mete : विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू. वाट्टेल ते करावं लागलं तरी चालेल पण मेटे यांचं स्वप्न पूर्ण करू. सध्या मराठा समाजाला जे जे काही द्यायचं आहे. त्या गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहोत.

Vinayak Mete : मराठा आरक्षणाचा चेहरा हरपला, लोकनेते विनायक मेटे यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
मराठा आरक्षणाचा चेहरा हरपला, लोकनेते विनायक मेटे यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोपImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 15, 2022 | 5:07 PM
Share

बीड: मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणून हा प्रश्न धसास लावण्यासाठी मोठं आंदोलन उभं करणारे नेते, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबईच्या समुद्रात उभारला जावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करणारे नेते आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे लोकनेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. राजेगाव या त्यांच्या मूळ गावी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde), केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार, खासदार यावेळी उपस्थित होते.

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा काल खोपोली जवळ भातान बोगद्याजवळ अपघात झाला होता. अपघातानंतर एक तास कोणतीही वैद्यकीय सुविधान न मिळाल्याने उपचारा अभावी त्यांचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांचं पार्थिव काल दुपारी वडाळा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं पार्थिव राजेगावमध्ये आणण्यात आलं. आज दुपारी पावणे पाच वाजता त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी मानवंदनात देत शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.

नेत्याच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

यावेळी आपल्या लाडक्या नेत्याचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी राजेगावात हजारो कार्यकर्ते जमले होते. मेटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी केवळ पंचक्रोशीतीलच ग्रामस्थ उपस्थित नव्हते. तर संपूर्ण मराठावाडा आणि महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पाय ठेवायलाही जागा नव्हती एवढी प्रचंड गर्दी यावेळी झाली होती. यावेळी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडत मेटे यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर धार्मिक परंपरेनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अन् अनेकांना अश्रू अनावर झाले

विनायक मेटे यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने अग्नी देताच हजारो कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. आपला लाडका नेता आपल्यात नाहीत या कल्पनेने अनेकांना हुंदका अनावर झाला. कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू आले. तर काहींनी हंबरडा फोडत आपला दुखावेग व्यक्त केला. यावेळी अमर रहे, अमर रहे, विनायक मेटे अमर रहेच्या घोषणाही देण्यात आल्या.

मेटेंचं बलिदान वाया जाऊ देणार नाही

विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू. वाट्टेल ते करावं लागलं तरी चालेल पण मेटे यांचं स्वप्न पूर्ण करू, असं सांगतानाच सध्या मराठा समाजाला जे जे काही द्यायचं आहे. त्या गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच मेटे यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. मराठा समाजासाठी जे जे करावं लागेल ते करू. हा आमच्या सरकारचा शब्द आहे, असंही त्यांनी सांगितलं.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.