AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलडाणा जिल्ह्यात 3 महिन्यांमध्ये 10 बालविवाह रोखले; ग्रामीण भागात बालवयातच मुलींच्या लग्नाचे प्रमाण वाढले

बालवयातच मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षणदेखील पूर्ण होत नाही. त्यांना अर्धवट शिक्षण घ्यावे लागते. पालकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी संसार थाटावा लागतो. अशावेळी हे बालविवाह रोखणे आवश्यक असते. समाजातील जागरुक नागरिक (Aware Citizens) यासाठी मदत करतात. त्यामुळं हे शक्य होतं.

बुलडाणा जिल्ह्यात 3 महिन्यांमध्ये 10 बालविवाह रोखले; ग्रामीण भागात बालवयातच मुलींच्या लग्नाचे प्रमाण वाढले
वीज गुल झाल्यामुळे लग्नाचा मुहूर्त मध्यरात्री 1 पर्यंत खोळंबलाImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 5:11 PM
Share

बुलडाणा : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (District Women and Child Development Officer) कार्यालया अंतर्गत जिल्हा बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईनच्या समन्वयाने बालविवाह रोखण्याचं काम केलं जातं. बुलडाणा जिल्ह्यात जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 या तीन महिन्यांच्या कालावधीत 10 बालविवाह रोखण्यात यश आलेय. सद्यस्थितीत मुलीच्या लग्नाचे वय 18 आणि मुलाच्या लग्नाचे वय हे 21 वर्षे आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. बालवयातच मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षणदेखील पूर्ण होत नाही. त्यांना अर्धवट शिक्षण (Partial Education) घ्यावे लागते. पालकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी संसार थाटावा लागतो. अशावेळी हे बालविवाह रोखणे आवश्यक असते. समाजातील जागरुक नागरिक (Aware Citizens) यासाठी मदत करतात. त्यामुळं हे शक्य होतं.

1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती

लहान वयात लग्न केल्यामुळे शारीरिक तसेच मानसिक आजारांना बळी पडावे लागत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु समाजातील जागरुक नागरिक आणि ग्रामस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून हे बालविवाह रोखण्यात येतात. समाजात होणाऱ्या बालविवाहाची माहिती जिल्हा कल्याण समिती चाईल्ड लाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी दिलेली असते. या माहितीच्या आधारे जिल्हा बाल कल्याण समिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईनच्या समन्वयाने बुलडाणा जिल्ह्यात 10 बालविवाह रोखण्यात आले.

यांच्या माध्यमातून रोखण्यात आले बालविवाह

हे बाल विवाह जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 या तीन महिन्यांच्या कालावधीत रोखण्यात आले आहेत. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा उज्ज्वला कस्तुरे, समिती सदस्या ॲड. किरण राठोड, आशा सौभाग्ये, ॲड. सदाशिव मुंडे, बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे, चाईल्ड लाईनचे समन्वयक शेख शोएब व ग्रावसेवक, ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्य, अंगणवाडी सेविकांच्या मदतीने संबंधित बालिका व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून बालविवाह रोखण्यात यश आले आहे. अशी माहिती जिल्हा बालकल्याण समितीच्या सदस्या किरण राठोड यांनी दिली.

चंद्रपुरातील पवनपार, मरेगाव, गुंजेवाहीतील सापडलेल्या वस्तू सारख्याच; जिल्हा प्रशासनाने ISRO दिले पत्र

Raosaheb Danve on Raj Thackeray: राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा नारा, गडकरींची भेट, मनसे-भाजप युती होणार का?; रावसाहेब दानवेंकडून पहिलंच मोठं विधान

Sujay Vikhe VIDEO: तर आम्ही एका मिनिटात पलटी मारतो, सुजय विखेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, मोदींच्याच रॅलीचं उदाहरण

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.