Sujay Vikhe VIDEO: तर आम्ही एका मिनिटात पलटी मारतो, सुजय विखेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, मोदींच्याच रॅलीचं उदाहरण

भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (sujay vikhe patil) पुन्हा एकदा आपल्या भाषणामुळे चर्चेत आले आहेत. जिथे न्याय मिळेल तिथे आम्ही आहोत. आमच्यावर अन्याय करा. आम्ही एक मिनिटात पलटी मारू असं वक्तव्य खासदार सुजय विखे पाटलांनी केलाय.

Sujay Vikhe VIDEO: तर आम्ही एका मिनिटात पलटी मारतो, सुजय विखेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, मोदींच्याच रॅलीचं उदाहरण
तर आम्ही एका मिनिटात पलटी मारतो, सुजय विखेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 12:51 PM

अहमदनगर: भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (sujay vikhe patil) पुन्हा एकदा आपल्या भाषणामुळे चर्चेत आले आहेत. जिथे न्याय मिळेल तिथे आम्ही आहोत. आमच्यावर अन्याय करा. आम्ही एक मिनिटात पलटी मारू असं वक्तव्य खासदार सुजय विखे पाटलांनी केलाय. तर ज्या पक्षासाठी मोदींच्या (pm narendra modi) विरोधात पाथर्डीत रॅली काढली, तो पक्ष आम्हाला न्याय देऊ शकला का? नाही देऊ शकला. म्हणून आम्ही पलटी मारली, असं खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. माणूस एका कुटुंबाविरोधात, एका वैचारिकते विरोधात आजीवन लढला म्हणून त्याच्यावर अन्याय व्हावा, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी (farmer) लढला म्हणून अन्याय व्हावा, हा अन्याय आम्हाला मान्य नाही. आमचा गट जिवंत ठेवतो. आमचे कार्यकर्ते जिवंत ठेवतो. ज्या दिवशी विखेंचे कार्यकर्ते संपतील त्या दिवशी शेतकऱ्यांना कोणीही वाली राहणार नाही, असं परखड मतही सुजय विखे यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यात तू तू मै मै सुरूच आहे. आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईवरून भाजपवर दोन दिवसांपूर्वीच निशाणा साधला आहे. तर केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी वीज वितरण अधिकाऱ्याला कारवाईची धमकी दिल्याप्रकरणी तर सुजय विखे यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेचा समाचार रोहित पवार यांनी घेतलाय. वकील सतीश उके हे सातत्यानं भाजपच्या विरोधात बोलतात. तर त्यांच्याकडे बीजेपी विरोधात पुष्कळ माहिती आहे. ती घेण्यासाठी कारवाई केली असावी अस मत त्यांनी मांडलंय.

लहानपणापासून त्यांची शिकवण तशी नसावी

केंद्रीय यंत्रणेचा वापर लोकशाहीला दडपण्यासाठी केला जात असेल तर ते चुकीचं आहे, असा घणाघात रोहित पवार यांनी केलाय. तसेच ज्या कारवाया होत आहे त्यामुळे ईडीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती करावी लागेल अशी उपरोधिक टीका रोहित पवारांनी केलीय. तसेच जातीय तेढ निर्माण होता कामा नये, असे मत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच सुजय विखे यांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. चेष्टा करायची असे म्हणून बोलण्याच्या ओघात बोलून गेले असतील. कारण ते एका प्रतिष्ठित परिवाराकडून येतात. लहानपणापासून त्यांची शिकवण अशी नसावी, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

दिल्लीतून महाराष्ट्रात गनिमी काव्याने रेमडेसिवीर आणले; वाचा, सुजय विखे पाटील कोण आहेत?

Gulabrao Patil on Raj Thackeray: राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते, गुलाबराव पाटील यांची घणाघाती टीका

Maharashtra News Live Update : महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांची शरद पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसी

Sanjay Raut: तर त्यांचा नंबर राजकारणात ‘ढ’ पेक्षा खाली मानावा लागेल, संदीप देशपांडेंना राऊतांचं उत्तर

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.