वादळी वाऱ्यात घराची भिंत कोसळली, दोन बालिका अडकल्या, आईच्या काळजाची ठोका चुकला

विदर्भात सर्वत्र पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसाने बळी घेणे सुरू केले. बुलढाण्यात भिंत कोसळून दोन बालिका त्यात अडकल्या.

वादळी वाऱ्यात घराची भिंत कोसळली, दोन बालिका अडकल्या, आईच्या काळजाची ठोका चुकला
| Edited By: | Updated on: Apr 08, 2023 | 7:25 AM

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात सर्व दूर विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसाने बळी घेणे सुरू केले. बुलढाण्यात भिंत कोसळून दोन बालिका त्यात अडकल्या. घर पडकं होतं. झोपडीवजा घरात दोन मुली खेळत होत्या. अचानक विजांचा कडकडाट झाला. सोसाट्याचा वारा आला. या वाऱ्यात त्यांच्या पडक्या घराची भिंत कोसळली. त्या भिंतीखाली दोन्ही मुली आल्या. खामगाव तालुक्यातील चितोडा येथील 40 वर्षीय शेतकरी महादेव कवडे हे आपल्या शेतात असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झालाय. तर दुसऱ्या घटनेत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने घराची भिंत अंगावर पडल्याने संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथील दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. दुसरी एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

दोन मुली भिंतीखाली सापडल्या

बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने काल सायंकाळी थैमान घातलं. यात संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथील गणेश बोरकर यांच्या घराची भिंत कोसळली. त्या भिंतीखाली दोन वर्षीय कृष्णालीसह राधा नामक मुली दबल्या गेल्या होती.

तात्काळ नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. राधा व कृष्णली दोघींना बाहेर काढण्यात आले. जवळ असलेल्या वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी दोन वर्षीय कृष्णाली हिला मृत घोषित केलं, तर दुसरी बालिका राधा हिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

अंगावर वीज पडून शेतकरी ठार

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चितोडा येथील 39 वर्षीय शेतकरी गोपाल महादेव कवळे यांच्यावर वीज पडली. यात यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत शेतकरी गोपाळ कवळे हे त्यांच्या अंबिकापूर शिवारातील शेतात कुटारची गंजी झाकण्यासाठी गेले होते.

विजांचा कडकडाट सुरु झाला. अंगावर वीज पडल्याने गोपाल कवळे यांचा मृत्यू झाला. याबाबत खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. या अवकाळी पावसाने हैदोस मांडला आहे.