अस्वलाच्या मुक्त संचारामुळे नागरिक घाबरले, वनविभागाने सांगितले…

Buldhana news : रात्रीच्यावेळी अस्वलाने मंदीर गाठल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. हे अस्वल देवळात कसे काय आले असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

अस्वलाच्या मुक्त संचारामुळे नागरिक घाबरले, वनविभागाने सांगितले...
bear at buldhana templeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 10:23 AM

गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (BULDHANA) जिल्ह्यात मागच्या काही दिवसात अस्वल (ANIMAL VIDEO) मानवी वस्तीच्या बाजूला फिरत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बाजूला जंगल असल्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडत असल्याचं नागरिक सांगत आहेत. वनविभागाने अनेकदा प्राण्यांचा बदोबस्त केला आहे, परंतु वारंवार अशा पद्धतीचे प्राणी दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. एक भल मोठ अस्वल मंदीराच्या आवारात फिरत असल्याचं एका व्यक्तीने मोबाईल शूट केला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल (BEAR VIDEO VIRAL) झाला आहे.

अस्वलाने गाठले गावचे मंदिर

बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यप्राणी आता आजूबाजूच्या लोक वस्तीमध्ये फिरत असल्याचं पाहायला मिळतय आहे. खामगाव तालुक्यातील गणेशपुर जवळ असलेल्या मोहाडी येथील महादेवाच्या मंदिरात रात्री दरम्यान भल्या मोठ्या अस्वलाचा मुक्त संचार पाहायला मिळाला आहे. यावेळी परिसरात असलेल्या नागरिकांनी अस्वलाचा मुक्त संचार जवळून अनुभवला आहे. जंगले सोडून वन्यप्राणी गावाकडे कूच करत असल्याने गावात देखील मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने सातत्याने जंगलाबाहेर येणाऱ्या या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करू लागले आहेत.

हे सुद्धा वाचा

परिसरात दहशतीचे वातावरण

ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यप्राणी यापुर्वी सुध्दा मानवी वस्तीत पाहायला मिळाले आहेत. अनेक प्राण्यांनी तिथल्या इसमांवरती हल्ला सुध्दा केला आहे. जवळच्या जंगलात हिस्त्रप्राणी असल्यामुळे नागरिकांनी त्या परिसरात जाऊ नये असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अस्वलाला पुन्हा जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात येणार आहे. आतापर्यंत वनविभागाने तिथं अनेकांना प्राण्यांना पकडलं आहे. तर काही प्राण्यांना जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.