AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भला मोठा प्राणी गिळंकृत, 12 फुटी अजगराचे प्राण संकटात, सर्पमित्रांनी जिकरीने रेस्क्यु ऑपरेशन राबवले

बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई परिसरात बारा फूट लांबीचा अजगर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, हा अजगर त्यावेळी संकटात होता. भला मोठा प्राणी गिळंकृत केल्याने त्याचे आयुष्य संकटात पडले होते. सर्पमित्रांनी मदतीला धावून येत या 12 फुटाच्या अजगराचे मोठ्या जिकरीने प्राण वाचवले आहे. त्यानंतर या अजगराला ज्ञानगंगा अभ्यारण्यात सोडण्यात आले.

भला मोठा प्राणी गिळंकृत, 12 फुटी अजगराचे प्राण संकटात, सर्पमित्रांनी जिकरीने रेस्क्यु ऑपरेशन राबवले
Buldhana Python Rescue
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Nov 30, 2021 | 7:58 AM
Share

बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई परिसरात बारा फूट लांबीचा अजगर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, हा अजगर त्यावेळी संकटात होता. भला मोठा प्राणी गिळंकृत केल्याने त्याचे आयुष्य संकटात पडले होते. सर्पमित्रांनी मदतीला धावून येत या 12 फुटाच्या अजगराचे मोठ्या जिकरीने प्राण वाचवले आहे. त्यानंतर या अजगराला ज्ञानगंगा अभ्यारण्यात सोडण्यात आले.

Buldhana Python Rescue

Buldhana Python Rescue

नेमकं काय घडलं?

बुलडाण्यातील पिंपळगाव सराई येथील विष्णू तरमळे यांच्या शेतात सोमवारी सायंकाळच्या सुमारास हरभऱ्यामध्ये बारा फूट लांबीचा आणि जवळपास 40 किलो वजनाचा अजगर आढळून आला. अजगर दिसल्याचं कळताच संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर रायपूर येथील सर्पमित्रांना संपर्क करण्यात आला. या अजगराला रायपूर येथील सर्पमित्र संदीप कांबळेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतामध्ये जाऊन मोठ्या जिकरीने त्या अजगराला पकडले. मात्र, यावेळी त्यांच्या लक्षात आलं की या अजगराने काहीतरी गिळले आहे, ज्यामुळे त्याला त्रास होतोय.

अजगराने काही तरी गिळल्याने तो एकाच ठिकाणी स्थिर होता आणि त्याचे पोट ही फुगलेले होते. सर्पमित्रांना कळाले की अजगराचे प्राण संकटात आहेत. त्यांनी तात्काळ अजगराच्या पोटातून मृत अवस्थेतील प्राण्याला बाहेर काढले आणि अगजराला जीवन दान दिले.

त्यानंतर सर्पमित्र त्या अजगराला पकडून ज्ञानगंगा अभ्यारण्यात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. पिंपळगाव सराई परिसरात एवढा मोठा अजगर दिसण्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे अजगराला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी याठिकाणी जमली होती.

संबंधित बातम्या :

Video: पिलांच्या रक्षणासाठी आई काय करते पाहा, मादा अजगराचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

Video: नदीत उडी मारुन सापाला असं पकडलं की, जसं तो एक खेळणं आहे, मुलाचा व्हिडीओ व्हायरल

धुळ्यातील झोतवाडे येथे दुसऱ्यांदा आढळला 8 फुटाचा अजगर

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल