Video: नदीत उडी मारुन सापाला असं पकडलं की, जसं तो एक खेळणं आहे, मुलाचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओ क्लिपच्या सुरुवातीला एक अजगर नदीत वेगाने जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ रात्रीच्या वेळी शूट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, साप टॉर्चच्या प्रकाशाखाली जात असल्याचे चित्रित करण्यात आले आहे.

Video: नदीत उडी मारुन सापाला असं पकडलं की, जसं तो एक खेळणं आहे, मुलाचा व्हिडीओ व्हायरल
सापाला पकडणारा मुलगा

सापाचे नाव ऐकताच अनेकांची हवा टाईट होते. आता विचार करा, की साप अचानक समोर आला तर तुम्ही काय कराल? भीतीपोटी तुम्ही इकडे तिकडे धावायला लागाल हे उघड आहे. पण सध्या असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. व्हिडिओमध्ये एक मुलगा ज्या पद्धतीने अंधारात साप पकडण्यासाठी नदीत उडी मारतो, ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटले आहे की, हा मुलगा वेडाच आहे. ( Snake Catch Video Shocking Viral Video Boy Catches Python as if it is a toy left netizens amazed )

व्हायरल व्हिडिओ क्लिपच्या सुरुवातीला एक अजगर नदीत वेगाने जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ रात्रीच्या वेळी शूट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, साप टॉर्चच्या प्रकाशाखाली जात असल्याचे चित्रित करण्यात आले आहे. पण पुढच्याच क्षणी जे काही घडते ते धक्कादायक असते. साप नदीत शिरताच एका मुलानेही त्यात उडी मारली. यानंतर हा मुलगा अजगराला पटकन पकडून बाहेर येताना दिसत आहे.

चला तर मग पहिला हा धक्कादायक व्हिडिओ पाहूया.

 

View this post on Instagram

 

A post shared by Royal Pythons (@royal_pythons_)

हा मुलगा ज्या पद्धतीने न घाबरता सापाच्या मागे धावत नदीत उडी मारतो ते पाहिल्यानंतर तुम्हीही त्याच्या धाडसाचे कौतुक कराल. तथापि, तुमच्यापैकी अनेकांना त्याची कृती मूर्खपणाची वाटेल. कारण ज्या सापापासून लोक पळतात त्याला पकडण्यासाठी तोही रात्री नदीत उडी मारतो. तिथे मगर आली तर काय होईल याची कल्पना करा.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर royal_pythons_ या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘फ्लोरिडाच्या वेटलँड एव्हरग्लेड्समध्ये बर्मीज पायथन पकडत आहे.’

एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘पाण्यात उडी मारताना 10 फुटाची मगर असती तर अजून बरं झालं असतं.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे की, ‘मला या गरीब सापाबद्दल वाईट वाटतं.’ एका युजरने लिहिले आहे, काय करतोयस भाऊ, थोडी काळजी घे. ही एक अतिशय धोकादायक पद्धत आहे. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘मला हे पाहून आश्चर्य वाटते की या मुलांना सापांची अजिबात भीती वाटत नाही.’

हेही पाहा:

Video: जोरदार लाटा तरी सापाची लाटांवर स्वार होण्याची हिंमत, लाटांशी खेळणाऱ्या सापाचा व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक! प्रवचन देत असताना साधूला आला हार्ट अटैक, जागीच मृत्यू

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI