AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सरकार घोषणा करण्यात फक्त पुढं”;नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लबोल

सरकार घोषणा करण्यात पुढे असून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली आहे.

सरकार घोषणा करण्यात फक्त पुढं;नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लबोल
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 15, 2023 | 5:28 PM
Share

बुलढाणा : मागील मार्च महिन्यात आणि आता या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाच्या तडाक्यात सापडल्यामुळे शेतकऱ्याना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. सलग चार वेळा शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागल्यामुळे सरकारतर्फे नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळणार असल्याची घोषणा केली होती.

मुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, या नुकसानीमध्ये जर कोणताही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही.

त्यानंतर आता विरोधकांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी करून नुकसान भरपाईवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

आज विरोधी पक्षनेतेत अंबादास दानवे यांनी बुलढाणा दौरा करून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फक्त घोषणा केली जाते मात्र प्रत्यक्ष मदत मिळत नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेत्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना हे सरकार फक्त नुकसान भरपाईटी आणि पॅकेज जाहीर करत असते मात्र तशी मदत काही मिळत नाही असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी या सरकारकडे केली आहे. त्यांनी म्हटले आहे अवकाळी आणि गारपीटीमुळे ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे. त्याच वेळी शेतकऱ्यांना खरी मदतीची गरज होती. मात्र हे सरकार असंवेदनशील असल्याचे टीका त्यांनी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.

त्यामुळेआता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर म्हणजेच खामगाव तालुक्यातील चितोडा येथील शेतीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

तर सरकार फक्त घोषणा करत असून त्यांना मदत मिळत नाही, त्यामुळे हे सरकार संवेदनाहिन असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

तर सरकार घोषणा करण्यात पुढे असून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली आहे.

Follow Us
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?