Buldhana : नवऱ्याचा खतरूड डान्स पाहून नातेवाईक संतापले, त्याचं मंडपात लावलं दुसऱ्याशी लग्न

शिर का झाला याचा जाब नवरीच्या नातेवाईकांनी विचारला. त्यावेळी दोन कुटुंबियांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे नवरीकडच्या मुलांनी तात्काळ त्यांच्या उपस्थित असलेल्या नातेवाईकासोबत लग्न लावण्याचा निर्णय घेतला.

Buldhana : नवऱ्याचा खतरूड डान्स पाहून नातेवाईक संतापले, त्याचं मंडपात लावलं दुसऱ्याशी लग्न
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 10:11 PM

बुलढाणा : लग्न होणार म्हणून नटलेली नवरी होणाऱ्या नवऱ्याची वाट पाहत बसली होती. त्यावेळी तिच्या मनात ‘देर ना हो जाए, कही देर ना हो जाए’ असं गाणं सुरू असावं. पण लग्न होणार या खुशीने मित्रांच्यासोबत नवरा नाचत (Dancing) बसला. त्यावेळी तो मित्रांच्यासोबत खुशाल डान्स करीत होता. मुलगा येत नसल्याने मुलीच्या नातेवाईकांनी (relatives) तात्काळ दुसऱ्या मुलाशी लग्न लावण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी नवरीने चक्क नातेवाईकांना सुचविलेल्या नवरदेवाशी लग्न केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना मलकापूर (malkapur) पांग्रा येथे घडली आहे

मित्रांच्या नादात नवरी गमावली

मलकापूर पांग्रा येथील हा विवाह सोहळा परिसरात अत्यंत चर्चेचा ठरला आहे. डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या मित्रांच्या नादात नवरदेवाला नवरी गमावण्याची वेळ आली आहे. लग्न मंडपात नवरदेव उशिरा आल्याने मुलीकडच्या नातेवाईकांनी नवरदेवासोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्या ओळखीच्या नातेवाईकासोबत नवरीचे लग्न लावून दिले. 22 तारखेला त्यांचा विवाह होणार होता. दुपारी साडेतीनचा मुहुर्त ठरला होता. दिलेल्या वेळेच्या आत नवऱ्याकडील मंडळींनी पोहोचणं गरजेचं होतं. परंतु नवरदेव आणि त्याचे नातेवाईक वेळेत आले नाहीत. त्यामुळे मुलीकडचे नातेवाईक संतापले होते. नवऱ्याकडची मुलं मद्यधुंद अवस्थेत नाचत असल्याने चार तास लग्नाला विलंब झाला.

लग्न न लावताच नवरदेव पळाला

उशिर का झाला याचा जाब नवरीच्या नातेवाईकांनी विचारला. त्यावेळी दोन कुटुंबियांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे नवरीकडच्या मुलांनी तात्काळ त्यांच्या उपस्थित असलेल्या नातेवाईकासोबत लग्न लावण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या मुलासोबत लग्न लावत असल्याचे समजल्यावर नवऱ्याकडच्या लोकांनी तात्काळ तिथून पळ काढला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.