Buldana | दानापुर खुर्द ग्रामस्थांना गावात जाण्यासाठी रस्ताच नाही, वान नदीलाच्या काठावरून धोकादायक पध्दतीने ये-जा सुरू!

| Updated on: Jul 27, 2022 | 8:23 AM

सध्या पावसाळा असून नदी पात्रात पाणी वाहत आहे. मात्र सध्या पाणी कमी असल्यामुळे गावात जाण्याकरिता एवढाच नदीकाठ शिल्लक उरलाय. विशेष म्हणजे गावात जाताना या पाऊल वाटेने जात दुचाकी देखील घेऊन गेल्या जातात.

Buldana | दानापुर खुर्द ग्रामस्थांना गावात जाण्यासाठी रस्ताच नाही, वान नदीलाच्या काठावरून धोकादायक पध्दतीने ये-जा सुरू!
Image Credit source: tv9
Follow us on

बुलढाणा : संग्रामपुर (Sangrampur) तालुक्यातील दानापुर खुर्द या गावात येण्या-जाण्याकरिता गावकऱ्यांना गावा जवळील एका शेतातून रस्ता होता. मात्र हा रस्ता (Road) मागील एक महिन्यांपूर्वी काही लोकांनी बंद केलायं. त्यामुळे या शेताच्या बाजुलाच असलेल्या वान नदीच्या काठावरून अत्यंत धोकादायक पध्दतीने नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वान नदीलाही (River) पाणी असल्याने धोका अधिक आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी सुरक्षित रस्ता द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे गेल्या अनेक दिवसांपासून केली जातंय.

वान नदीच्या काठावरून धोकादायक पध्दतीने प्रवास सुरू

वान नदीच्या काठावरून धोकादायक पध्दतीने गावकऱ्यांना, शाळकरी मुलांना, वयोवृद्ध महिला, पुरुषांना आणि आजारी पडलेल्या रुग्णांना सुद्धा या रस्त्यांनीच जावे लागते. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी काही महत्वाचे काम असेल तर अंधारामधून रस्ता काढतही ग्रामस्थांना जावे लागते. रात्रीच्या वेळी नदीच्या पाण्याचा वाढलेला प्रवाहही बऱ्याच वेळा लक्षात देखील येत नाही.

हे सुद्धा वाचा

दानापुर खुर्द येथील ग्रामस्थांनी तहसीलदाऱ्यांकडे केली तक्रार

सध्या पावसाळा असून नदी पात्रात पाणी वाहत आहे. मात्र सध्या पाणी कमी असल्यामुळे गावात जाण्याकरिता एवढाच नदीकाठ शिल्लक उरलाय. विशेष म्हणजे गावात जाताना या पाऊल वाटेने जात दुचाकी देखील घेऊन गेल्या जातात. बुलडाणा जिल्ह्यातील दानापुर खुर्द येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना सुद्धा या प्रकाराबद्दल माहिती देऊन रस्त्याचा विषय लवकर मार्गी लावण्याची विनंती केलीयं.

प्रशासनाने केली ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने फक्त जागेवर जाऊन पाहणी केली. मात्र ग्रामस्थांना रस्ता देण्या संदर्भात तोडगा निघाला नाहीयं. या गावातील ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना तत्काळ रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. अन्यथा या रस्त्याने जाताना एखादी घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार ?, असा प्रश्न ग्रामस्थांनी निर्माण केलायं.