देवेंद्र, जनाची नाही तर मनाची…, उद्धव ठाकरे यांनी ऑडिओचं ऐकविला

शेतकऱ्यांची वीजबिलं माफ करा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं.

देवेंद्र, जनाची नाही तर मनाची..., उद्धव ठाकरे यांनी ऑडिओचं ऐकविला
उद्धव ठाकरे Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 9:12 PM

बुलडाणा – सत्तांतरानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी बुलडाण्यात सभा घेतली. उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस होते. शिंदे गटाचा उल्लेख खोके सरकार आणि रेडे करतानाचं देवेंद्र फडणवीस यांचा ऑडिओ लावला. या बोक्यांना खोक्यांची भूक लागली होती. म्हणून तुमच्याशी गद्दारी करून गेले आहेत. तुम्ही केवळ स्वार्थासाठी गद्दार म्हणून गेले. या गद्दारांना आता माफी करायची नाही, असं आवाहन त्यांनी शेतकरी मेळाव्यात केले.

हा आयातपक्ष झाला आहे. हा पक्ष आहे की, चोरबाजार आहे. यांना नाव बाळासाहेबांचं पाहिजे. चेहरा बाळासाहेब यांचा पाहिजे. शिवसेनेचं नाव पाहिजे. आणि मोदींचा आशीर्वाद पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

बुलडाण्यातील चिखली येथील शेतकरी मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. भरसभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची क्लीप लावली.

विरोधात असताना वीजबील माफ करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. ती क्लीप लावून आता शेतकऱ्यांची वीजबिलं माफ करा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं. देवेंद्र फडणवीस यांचा ऑडिओ क्लीप उद्धव ठाकरे यांनी ऐकविला.

नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला गेले. कर्तृत्वावर विश्वास नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी  उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा उल्लेख खोके सरकार आणि रेडे असा केला. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढऊ नये, असं आवाहन त्यांनी शिंदे गटात गेलेल्या आमदार व खासदार यांना केले.

काय कमी केलं होतं. नाव आणि चिन्हं गोठवलंय. पण, मशाली पेटविलं. सळसळत रक्त हीच आमची ओळख आहे. भाजप हा भाकडपक्ष झाला आहे. कन्याकुमारीपासून यादी काढा. किती पक्ष आयात केले आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.