AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana Murder : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, आरोपी पत्नीसह प्रियकर अटकेत

दत्तात्रय कव्हळे हे मुलीचा दहावीचा पेपर असल्याने तिला परीक्षेसाठी मंगळवारी साखरखेर्डा येथे गेले होते. तेथून आल्यानंतर त्यांचे पत्नीसोबत भांडण झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेला एजाज आणि कव्हळे यांच्या पत्नीने मिळून त्यांचे हातपाय बांधून त्यांना पलंगावर टाकले आणि दोरीने त्यांची गळा आवळून हत्या केली.

Buldhana Murder : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, आरोपी पत्नीसह प्रियकर अटकेत
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या
| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 7:58 PM
Share

बुलढाणा : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीस प्रियकरा (Boyfriend)च्या मदतीने पत्नी (Wife)नेच हात पाय बांधून आणि गळा आवळून ठार (Murder) केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे मंगळवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा आरोपी प्रियकर या दोघांवरही गुन्हा दाखल करीत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. दोरीने गळा आवळून पीडित पतीला मारण्यात आले. दत्तात्रय कव्हळे असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर एजाज खान असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. (Husband murdered with the help of boyfriend in an immoral relationship)

गावातील इसमासोबत पत्नीचे अनैतिक संबंध

बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे पीडित दत्तात्रय कव्हळे आपल्या पत्नीसह राहतात. याच गावात एजाज खानही राहतो. कव्हळे यांची पत्नी आणि एजाज खान यांच्यात अनैतिक संबंध होते. याबाबत पतीला कुणकुण लागल्यानंतर गावात गवगवा झाला. यानंतर एजाजने माफी मागितली आणि दोघांचे प्रेमसंबंध तुटले. त्यानंतर कव्हळे दाम्पत्य काही दिवसांसाठी दुसऱ्या गावात कामासाठी गेले होते. मात्र शेती खरेदीसाठी ते पुन्हा गावात आले. यानंतर कव्हळे यांची पत्नी आणि एजाजमध्ये पुन्हा प्रेमसंबंध जुळले.

दोरीने गळा आवळून केली हत्या

दत्तात्रय कव्हळे हे मुलीचा दहावीचा पेपर असल्याने तिला परीक्षेसाठी मंगळवारी साखरखेर्डा येथे गेले होते. तेथून आल्यानंतर त्यांचे पत्नीसोबत भांडण झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेला एजाज आणि कव्हळे यांच्या पत्नीने मिळून त्यांचे हातपाय बांधून त्यांना पलंगावर टाकले आणि दोरीने त्यांची गळा आवळून हत्या केली. ही बाब मयत दत्तात्रयच्या आईच्या लक्षात आल्यावर तिने पोलिसांत तक्रार दिली. आईच्या तक्रारीनुसार आरोपी पत्नीसह, तिचा प्रियकर एजाज खान पठाणवर गुन्हा दाखल करून साखरखेर्डा पोलिसांनी दोघांनाही अटक केली. (Husband murdered with the help of boyfriend in an immoral relationship)

इतर बातम्या

Nanded Accident : नांदेडमध्ये कार आणि मोटारसायकलमध्ये अपघात; दोन ठार तर दोन गंभीर जखमी

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात लाथाबुक्क्यांनी मारून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्या

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.