जिल्हा परिषदेत विद्यार्थ्यांनी भरवली शाळा, बेशुद्ध विद्यार्थिनीला घेऊन…

पावसाळ्याचे दिवस असल्याने वर्ग खोल्यात पावसाचे पाणी टपकते. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे डेक्स बेंच नाही. नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित हे विषय शिकविण्यासाठी शिक्षक नाही.

जिल्हा परिषदेत विद्यार्थ्यांनी भरवली शाळा, बेशुद्ध विद्यार्थिनीला घेऊन...
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 5:22 PM

बुलढाणा : माटरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 5 ते 10 वीपर्यंतचे वर्ग आहेत. तुकड्यांची संख्या 16 आहे. या शाळेतील शिक्षकांची मंजूर पदापैकी 8 ते 10 शिक्षकांची पदे अनेक वर्षापासून रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने वर्ग खोल्यात पावसाचे पाणी टपकते. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे डेक्स बेंच नाही. नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित हे विषय शिकविण्यासाठी शिक्षक नाही. संगणक लॅब बंद आहे. या सर्व समस्या सोडवण्यात याव्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.

जिल्ह्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय जिल्हा परिषदेची शाळा गळकी आहे.अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा शाळेला शिक्षक मिळावे, म्हणून मागणी करण्यात आली.

झेडपीच्या प्रांगणात भरवली शाळा

शाळेला शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच शाळा भरवली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घ्यावे, अशी मागणी विद्यार्थी करत होते. मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विद्यार्थ्यांना वेळ देत नव्हते. त्यामुळे बराच वेळ विद्यार्थी तात्कळत उभे होते.

गावकऱ्यांचा प्रचंड गोंधळ

यावेळी एका विद्यार्थिनीला भोवळ आल्याने ती बेशुद्ध पडली. त्यामुळे आक्रमक झालेले गावकरी आणि विद्यार्थ्यांनी या बेशुद्ध विद्यार्थिनीला घेऊन थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन गाठले. यावेळी जिल्हा परिषदेच्या इमारतीत विद्यार्थिनी, गावकऱ्यांचा प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला.

पोलिसांनी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकरते विद्यार्थी आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. शेवटी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

नागपुरातील मनपातही अशीच परिस्थिती

नागपूर महापालिकेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अद्याप शिक्षक नाहीत. मनपाच्या तीस शाळांमध्ये ६३ जागांसाठी मुलाखती देण्यात आल्या. अद्याप नियुक्त्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे काही शाळांमध्ये काही विषयांचे शिक्षक नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Non Stop LIVE Update
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.