ज्या पोलिसांचं तोंडभरून कौतुक केलं त्याच मुंबई पोलिसांचा अभिजीत दिपकेंना मोठा दणका, अडचणी वाढल्या, आता थेट…
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईमध्ये शुक्रवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात आलं, आता या प्रकरणात अभिजीत दिपकेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईमध्ये शुक्रवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये देशभरातून आलेले जेन झी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ तसेच निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना मुंबई पोलिसांचं कौतुक देखील केलं होतं, मुंबई पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केलं , त्यांचे मी आभार मानतो, मुंबई पोलिसांकडून दिल्ली पोलिसांनी काहीतरी शिकायला पाहिजे, असंही यावेळी अभिजीत दिपके यांनी म्हटलं होतं.
मात्र आता मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे, मुंबईमध्ये शुक्रवारी सीजेपीचं जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. मात्र परवानगी नसताना देखील हे आंदोलन झालं. आता या प्रकरणात पोलिसांनी आयोजकांसह 400-500 अज्ञात समर्थक आणि आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37 (1) (3) आणि कलम 135 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. अभिजीत दिपके यांनी मुंबई पोलिसांचं कौतुक केलं होतं. मात्र त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी अभिजित दिपके यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आयोजकांसह 400-500 अज्ञात समर्थक आणि आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता अभिजीत दिपके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पोलिसांची परवानगी नसताना देखील आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. आपल्या या मागणीसाठी मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील सीजेपीच्या वतीने देण्यात आला होता, मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील हे आंदोलन झालं, आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आयोजकांसह 400-500 अज्ञात समर्थक आणि आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.