AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज-उद्धव यांच्या गर्जना मोर्चाच्या आयोजकांवर अखेर गुन्हा दाखल; परवानगी घेतली नसल्याने मोठी कारवाई

ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसभर याबद्दल कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज-उद्धव यांच्या गर्जना मोर्चाच्या आयोजकांवर अखेर गुन्हा दाखल; परवानगी घेतली नसल्याने मोठी कारवाई
Case registered against Garjana Morcha organizers Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 8:51 PM
Share

मुंबईमध्ये आज ठाकरे बंधूंनी मोठा गर्जना मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये सर्वांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नेत्यांची मोठी भाषणं झाली, पण याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आझाद मैदान पोलिसांकडून दाखल कण्यात आला आहे. मोर्चाच्या आयोजकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकरे बंधुंनी आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि SIR प्रक्रियेविरोधात गर्जना मोर्चा काढला. मेट्रो सिनेमापासून या मोर्चाला सुरुवात झाली त्यानंत बीएमसी मुख्यालयापर्यंत मोर्चा पोहोचला. राज ठाकरे आणि उद्धव यांनी यावेळी जोरदार भाषण केलं. पण आता परवानगीशिवाय हा मोर्चा काढल्याप्रकरणी मोर्चाच्या आयोजकांच्या अडचणी वाढल्या आणि आता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

ज्ञानेश कुमारांच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. दोन दिवसांआधी सीजेपीने अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये मोठा मोर्चा काढला होता. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या मोर्चाची परवानगीचं घेतली नसल्याचं समोर आल्यानंतर आता आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह इतरही विरोधी पक्षांनी जाहीर पाठींबा दर्शविला होता. पण दुपारीच याप्रकरणी परवानगी नसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याची शक्यता होती. आता त्याप्रमाणे कारवाई झाली आहे. मुंबईतल्या आझाद मैदानाशिवाय या मोर्चाला कुठेही परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या आयोजकावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

भाजपची टीका

दरम्यान, या मोर्चावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून मोठी टीका करण्यात आली. भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंमधील जुन्या गोष्टी सांगत टीकास्र डागलं. स्वतः निवडणुका जिंकता येत नाहीत आणि त्यामुळे आयोगावर खापर फोडतात. राज आणि उद्धव यांनी एकमेकांकडे बघितलं पाहिजे. मध्यंतही फारकत घेता. टीका करता. कपडे फाडता आणि आता एकत्र येऊन सहमती दर्शवता. जसं राज आणि उद्धव यांचा पक्ष काम करतो तसंच निवडणूक आयोगाचंही झालं आहे. मतमतांतर झाल्यानंतर एकमत झालं.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात