AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, ‘वर्षा’वर तासभरापासून खलबतं सुरु

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर त्या दोघांची बैठक सुरु आहे.

नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, 'वर्षा'वर तासभरापासून खलबतं सुरु
| Updated on: Oct 02, 2024 | 3:07 PM
Share

Narayan Rane Meet Eknath Shinde : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. सध्या या अनुषंगाने विविध बैठका होत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर त्या दोघांची बैठक सुरु आहे. गेल्या तासाभरापासून नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

अमित शाहांचा मुंबई दौरा

महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्यामुळे आता येणारी विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी जास्त प्रतिष्ठेची बनली आहे. येत्या निवडणुकीत काहीही करुन आपलं महायुतीचं सरकार यावं, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्र दौरे करत आहेत. त्यातच कालपासून दोन दिवस अमित शाह हे मुंबईत आहेत. यावेळी त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. या मेळाव्याला नारायण राणेंनीही हजेरी लावली होती.

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा

यानंतर आता नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा केली. तसेच महायुतीचा फॉर्म्युला कसा असणार, याबद्दलही त्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी नारायण राणेंनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारांबद्दलही चर्चा केली. कुडाळ मालवण विधानसभा मतदार भाजपला द्यावा, अशी मागणी नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंकडे केली. सध्या या मतदारसंघात ठाकरे गटाचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत.

एकनाथ शिंदे भाजपसाठी हा मतदारसंघ सोडणार का?

गेल्या काही महिन्यांपासून वैभव नाईक आणि राणे कुटुंबियांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता नारायण राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार भाजपसाठी सोडावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता राणे कुटुंबियांकडून वैभव नाईक यांना तगडी टक्कर मिळणार असल्याचे दिसत आहे. पण एकनाथ शिंदे हा मतदारसंघ सोडणार का? या मतदारसंघाऐवजी ते कोणता मतदारसंघ मागणार, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.

Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत