AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी खरातकडून अघोरी पूजा केली? बड्या नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ

नाशिक प्रकरणातील भोंदू बाबा अशोक खरात हा राज्यभरात सध्या चर्चेला विषय बनला आहे. त्याच्यावर आतापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच काही राजकीय नेत्यांचे देखील अशोक खरात यांच्यासोबत जवळचे संबंध असल्यामुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आलं आहे.

मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी खरातकडून अघोरी पूजा केली? बड्या नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ
Ashok KharatImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 25, 2026 | 4:53 PM
Share

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे एक-एक कारनामे आता समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात चांगलीच खळबळ उडाली आहे. खरातची एसआयटीकडून देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान त्याची मंगळवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं त्याला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 29 मार्च पर्यंत त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे.  दरम्यान त्यानंतर आता या प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासंदर्भात देखील मोठा दावा केला आहे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?  

‘सरकारने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे ही या बाबांशी अत्यंत जवळीकीचे संबंध आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही भोंदू सोबत फोटो समोर आले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पुजा केल्याची माहिती मिळते आहे. भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा महिन्यांपासून माहित होते.

फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रीमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती. पण त्यांच्या मित्रपक्षातील सहका-यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र मंत्र व अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदू बाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरु केली.. भोंदू बाबाच्या निमित्ताने ते आता मित्र पक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत,’ असं ट्विट हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे.

अशोक खरात याला पाच दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान अशोक खरात याची पोलीस कोठडी संपल्यानं त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयानं त्याला आणखी पाच दिवसांची म्हणजेच 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?