Disha Salian : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया; मोजक्या शब्दात महत्त्वाचं बोलले

दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. आता या प्रकरणावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते नेमके काय बोलले, जाणून घ्या

Disha Salian : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया; मोजक्या शब्दात महत्त्वाचं बोलले
chandrashekhar bawankule
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 15, 2026 | 10:13 AM

दिशा सालियन प्रकरणाची सीबीआयने पुन्हा चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. आधीच या प्रकरणाची दोन वेळा चौकशी झाली होती. परंतु दिशा सालियनच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतल्यानंतर पुन्हा एकदा चौकशीला सुरुवात झाली आहे. आता या प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. तर सीबीआयने नोंदवलेल्या जबाबात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झालं आहे. आता यावर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चौकशीनंतर सर्व समोर येईल, असे स्पष्ट केले.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. तर दिशा सालियन प्रकरणावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘दिशा सालियन प्रकरण कोर्ट, सीबाआयकडे आहे. त्यावर माझं मत मांडणं योग्य ठरणार नाही. या प्रकरणातील चौकशीनंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. चौकशीत सर्व समोर येईल. कशाला त्यावर टीकाटीप्पणी करायची. सीबीआय चौकशी होईल. त्यानंतर सत्य समोर येईल’.

राजस्थानच्या निकालवर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया 

राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निकालावरही मंत्री बावनकुळे यांनी भाष्य केलं. मंत्री बावनकुळे म्हणाले, ‘राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत्या. या निवडणुकीत जवळपास 239 नगरपालिका, महापालिका, नगरपरिषदेत सत्ता येईल. 10 पैकी 8 महापालिकेत महापौर भाजपचे होतील. बीकानेर आणि अजमेरमध्ये थोड्या मताने मागे आहोत. काँग्रेसने जेन-झीला मतदारांना वळवण्यासाठी दुरूपयोग केला. युवकांना समजलं की, त्यांचा दुरुपयोग केला जात आहे. युजीसीमध्ये मत खराब करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा फायदा काँग्रेसला झाला नाही. तिथे भाजपचा मोठा विजय झाला. आमचे पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेवर लोकांचा विश्वास आहे. अमित शहा यांनी चांगलं नियोजन केलं. भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांचं मार्गदर्शन होतं. या ठिकाणी आमचे प्रभारी होते, त्यांनी योग्य दिशा दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही चांगलं मार्गदर्शन केलं’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us