Sanjay Raut : Disha Salian प्रकरणाच्या FIR मध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut : दिशा सालियन प्रकरणात काल सीबीआयने एफआयआर दाखल केला. त्यात आदित्य ठाकरे यांचं नाव आहे. त्यावर आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत बोलले. त्यांनी या एफआयआरवर काय म्हटलय ते जाणून

दिशा सालियन प्रकरणात काल सीबीआयने एफआयआर दाखल केला. त्यात आदित्य ठाकरे यांचं नाव आहे. त्यावर आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत बोलले आहेत. “या संपू्र्ण विषयावरती मी कधीही बोललो नाही. त्याच्यावर माझं मत व्यक्त केलं नाही. हा अतिशय संवेदनशील विषय आहे. एका मुलीच्या चारित्र्याविषयीचा हा प्रश्न आहे. तिच्या कुटुंबावर कोसळलेला आघात आहे. तिचा मृत्यू दुर्देवी आहे. त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी वारंवार केला. मुंबई पोलिसांच्या इंटिग्रिटीवर संशय घेता येणार नाही” असं संजय राऊत म्हणाले. “महाराष्ट्रात आता शिवसेनेचं सरकार नाहीय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत. फडणवीस मुख्यमंत्री, गृहमंत्री तेच आहेत. त्यांच्याच काळात या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन क्लोजर रिपोर्ट देण्यात आला. त्यात आदित्य ठाकरे यांचा दुरान्वयेही संबंध नाही असं सांगण्यात आलं” असं संजय राऊत म्हणाले.
“विरोधकांचं सरकार आहे तरी मुंबई पोलिसांनी निष्पक्ष तपास करुन त्या मुलीला तिच्या कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. जे आरोप विरोधकांनी केले त्या दिशेने तपास केला. आदित्य ठाकरे यांचा कोणत्याही प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नाही. पुरावे सुद्धा नाहीत. हे सांगितलं, तरीही परत-परत राजकीय हेतूने प्रेरित पुन्हा पुन्हा चर्चा केली जाते. एका मुलीच्या अब्रुचे धिंडवडे काढले जात आहेत” असं संजय राऊत म्हणाले.
काही लोक मीडियामध्ये मोठमोठ्याने ओरडतायत
“हा आता राजकीय आखाडा झाला आहे. या राज्याच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही. हे षडयंत्र आहे म्हणून हे प्रकरण पुन्हा न्यायालयात नेलं. न्यायलयाने स्पष्टपणे सांगितलय की, सीबीआय चौकशी करा पण जो पर्यंत तपास पूर्ण होत नाही तो पर्यंत कोणीही आरोपी आहे असं ठरवू नका. काही लोक मीडियामध्ये मोठमोठ्याने ओरडतायत. काही संशयास्पद वक्तव्य करत आहेत. हे एक षडयंत्र, राजकीय कारस्थान आहे” असा दावा संजय राऊत यांनी केला. “महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाचं स्थान मोठ आहे. मराठी माणसाच्या ह्दयात ठाकरे कुटुंबाचं स्थान आहे. त्याला डाग लावण्याचं काम दिल्लीच्या माध्यमातून सुरु आहे. या बदनामी मोहिमेविरोधात आम्ही लढू, लढत राहू” असं संजय राऊत म्हणाले.
