Vaibhav Sooryavanshi: वैभवमुळे वर्ल्ड चॅम्पियन फलंदाजाला बायकोकडून ओरडा, नेमकं प्रकरण काय?
अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील दुसरा टी२० सामना लवकरच सुरू होणार आहे. मात्र, पहिल्या टी२० सामन्यात दोन्ही संघांमध्ये जे घडले, त्याबद्दल एका अनुभवी भारतीय क्रिकेटपटूने प्रश्न उपस्थित केले आहेत.

अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील दुसरा टी२० सामना लवकरच सुरू होणार आहे. मात्र, पहिल्या टी२० सामन्यात दोन्ही संघांमध्ये जे घडले, त्याबद्दल एका अनुभवी भारतीय क्रिकेटपटूने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने वैभव सूर्यवंशीसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप केला आहे. वैभवला पहिल्या टी-२० सामन्यात संधी मिळाली नव्हती यामुळे भारताचा माजी सलामीवीर श्रीकांत आणि त्याच्या पत्नीलाही दुःख झाले होते.
श्रीकांतने आपल्या यूट्यूब चॅनलवर, वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमधून वगळणे हे गैरवर्तन असल्याचे म्हटले आहे. श्रीकांतच्या मते, पहिल्या टी२० सामन्यासाठी त्याला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळायला नको होते. पहिल्या टी२० सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीकांतने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, जेव्हा सूर्यवंशी खेळत नव्हता, तेव्हा त्याने चित्रपट पाहायला सुरुवात केली होती. सूर्यवंशी खेळत नसल्याचे पाहून माझी पत्नीसुद्धा ओरडू लागली आणि म्हणाली की, मागच्या सामन्यात ‘सामनावीर’ ठरलेला खेळाडू खेळत नाहीये. माझ्या पत्नीने वैभवला संघातून वगळण्यावर प्रश्न विचारला. हे वैभवसाठी योग्य नाही. जर तो पुढचा सामना खेळला, तर धावा न केल्यास त्याला संघातून वगळले जाईल का, याचा विचार करावा लागेल.
श्रीकांत यांनी टीम इंडिया व्यवस्थापनावर वैभव सूर्यवंशीला योग्य वागणूक न दिल्याचा आरोप केला आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला सलामीच्या जोडीमध्ये वारंवार बदल करणे टाळण्याचा सल्लाही दिला.
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीला बेंचवर बसवण्यात आले होते आणि संजू सॅमसन व अभिषेक शर्मा यांना सलामीला खेळवण्यात आले होते. श्रीकांत म्हणाले की, “भारतीय संघाने एकतर संजू सॅमसनला खेळण्याची आणि धावा करण्याची पूर्ण संधी द्यावी किंवा वैभव सूर्यवंशीला संघातून न वगळता खेळवत राहावे. भारतीय संघ दोन सामन्यांमध्ये सॅमसनला आणि एका सामन्यात सूर्यवंशीला खेळवण्याची चूक करत आहे. हे दोन्ही खेळाडूंसाठी चांगले नाही.”
