Cricket : क्रिकेटमध्ये पहिलं बक्षीस बोकडं, दुसरं 5 कोंबड्या, जाणून घ्या तिसरं बक्षीस आहे काय ?

'चरण प्रीमियर लिग' हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे, असं समजून तरूणांनी 'चरण प्रीमियर लिग'सुरू केलं. गेल्यावर्षी मैदानात अनेक जुन्या खेळाडूंनी आपला खेळ पुन्हा दाखवला. त्यामुळे मैदानात एक पध्दतीचा उत्साह पाहायला मिळाला होता.

Cricket : क्रिकेटमध्ये पहिलं बक्षीस बोकडं, दुसरं 5 कोंबड्या, जाणून घ्या तिसरं बक्षीस आहे काय ?
'चरण प्रीमियर लिग' हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 6:00 AM

सांगली – सध्या तरूणाईच्या आवडतं आयपीएल (IPL 2022) सुरू असल्याने क्रिकेट शौकीन एकही मॅच पाहायची सोडत नाहीत. प्रत्येक मॅचमध्ये काय झालं हे एकदम बारकाईने पाहत असतात. तसेच त्यावर अनेकदा चर्चा देखील होते. सध्या जॉस बटलर आणि युजवेंद्र चहल या दोन खेळाडूंची अधिक चर्चा सुरू आहे. क्रिकेटमध्ये पहिलं बक्षीस बोकडं, दुसरं 5 कोंबड्या, अशी अजब बक्षीसं कधी तुम्ही ऐकली किंवा पाहिली आहेत का ? पण हे खरं आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चरण (Charan) गावात ‘चरण प्रीमियर लिग’चं आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत फक्त गावातील संघ खेळवले जातात. यावर्षी स्पर्धेचं हे दुसरं वर्षे आहे. तरूणांनी अजब बक्षीस ठेवल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. ही स्पर्धा 7 मे आणि 8 मे रोजी होणार आहे.

‘चरण प्रीमियर लिग’ हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे

‘चरण प्रीमियर लिग’ हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे, असं समजून तरूणांनी ‘चरण प्रीमियर लिग’सुरू केलं. गेल्यावर्षी मैदानात अनेक जुन्या खेळाडूंनी आपला खेळ पुन्हा दाखवला. त्यामुळे मैदानात एक पध्दतीचा उत्साह पाहायला मिळाला होता. यावर्षी आयोजकांनी प्रथम पारितोषिक 11,111 रूपये, चषक आणि मानाचा एक बोकडं ठेवला आहे. द्वितीय बक्षीस 7,777 रूपये चषक आणि 5 कोंबडे बक्षीस ठेवले आहे. तर तृतीय बक्षीस 5,555 रूपये, चषक आणि 5 कोंबडी अशी आहेत. बक्षीसांचा प्रकार अजब असल्याने भागात स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे.

आठ संघात स्पर्धा होईल

ही स्पर्धा गावातील संघापुरती मर्यादीत आहे. तिथं गेल्यावर्षीप्रमाणे आठ संघात स्पर्धा होईल. साखळी पध्दतीने सामने खेळवले जातात. या स्पर्धेची तारिख जाहीर झाल्यापासून पुन्हा क्रिकेटची चर्चा सुरू झाली आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी गावातील अनेक तरूण मुंबई पुणेहून येतात. गेल्यावर्षी अंतिम टप्प्यातील सामने अधिक रोमांचक झाले होते. त्यामुळे अनेकजण यंदाच्या ‘चरण प्रीमियर लिग’ची वाट पाहत होते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.