AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivjayanti | जय भवानी, जय शिवाजी… घोषणांनी दुमदुणार आग्रा येथील किल्ला, औरंगजेबाच्या तावडीतून राजेंची सुटका, काय आहे किल्ल्याचं महत्त्व?

यंदा आग्रा येथील लाल किल्ल्यावर (Agra Red Fort) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत दिवान ए आम सभागृहात शिवजयंती साजरी होणार आहे.

Shivjayanti | जय भवानी, जय शिवाजी... घोषणांनी दुमदुणार आग्रा येथील किल्ला, औरंगजेबाच्या तावडीतून राजेंची सुटका, काय आहे किल्ल्याचं महत्त्व?
Image Credit source: social media
| Updated on: Feb 17, 2023 | 9:45 AM
Share

Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती येत्या रविवारी १९ फेब्रुवारी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील शहरा-शहरात शिवजयंतीचा (Shivjayanti) उत्साह पहायला मिळणार आहे. या वर्षीच्या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा आग्रा येथील लाल किल्ल्यावर (Agra Red Fort) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत दिवान ए आम सभागृहात शिवजयंती साजरी होणार आहे.  या सोहळ्याला आधी पुरातत्त्व खात्याने परवानगी नाकारली होती. मात्र सामाजिक संस्थांनी याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्य सरकार सहआयोजक असल्यास आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल, असा निर्णय कोर्टाने दिला. त्यानंतर आता शिवजयंतीचा हा कार्यक्रम धडाक्यात साजरा होणार आहे.

ऐतिहासिक महत्त्व काय?

मुघल आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासात आग्रा येथील लाल किल्ल्याचं विशेष महत्त्व आहे. औरंगजेबासारख्या कपटी आणि दगेखोर बादशहानं शिवरायांना कैद करण्याचा डाव याच किल्ल्यावर रचला.

औरंगजेबानं १९६६ मध्ये त्याच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रित केलं होतं. दगेखोर औरंगजेबाचं आमंत्रण स्वीकारावं की नाही, या द्विधेत महाराज होते. अखेर पुत्र संभाजीराजे आणि शिवाजी महाराज हे दोघं १२ मे १९६६ रोजी आग्रा येथे पोहोचले. मात्र कपटी औरंगजेबानं या दोघांना इथेच बंदी बनवून ठेवलं. अवघा महाराष्ट्र संकटात सापडला होता.

तीन महिने बंदीत राहिल्यानंतर अखेर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि काही निष्ठावान सैनिकांसोबत आग्रा येथून मिठाईच्या पेटाऱ्यात बसून निघाले. हा दिवस होता १७ ऑगस्ट १९६६.

जागतिक वारसा

आग्रा येथील हा किल्ला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध ताजमहल या किल्ल्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे काही इतिहासकार, या किल्ल्याचं वर्णन करताना चार भिंतींनी घेलली प्रासाद महाल नगरी असं करतात. मुघल सम्राट बाबर, हुमायुं, अकबर, जहांगीर, शाहजहां आणि औरंगजेब येथेच राहत होते. इथूनच ते संपूर्ण भारतावर शासन करत होते.

ताजमहालचे विहंगम दृश्य

आग्रा किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावरून ताजमहालचं विहंगम दृश्य पाहता येतं. तु सुमारे ३ किमी परिसरात हा किल्ला विस्तारलेला आहे. तर किल्ल्याच्या भोवती ७० फूट उंच भिंती आहेत. राजस्थानातून आणलेल्या वाळूच्या दगडापासून किल्ल्याच्या भिंती उभारल्या आहेत. किल्ल्याला मुख्य चार दरवाजे आहेत. त्यापैकी एक खिजारी गेट म्हणून ओळखला जातो.तो नदीत उघडत असे. या घाटांमध्ये बादशाहला स्नान करायला आवडायचं, असं सांगण्यात येतं.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.