AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुजबळ खड्ड्यांना वैतागले, टोल बंद पाडणार !

३१ ऑक्टोबर पर्यंत रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास १ नोव्हेंबर पासून टोल बंद करण्याचा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

भुजबळ खड्ड्यांना वैतागले, टोल बंद पाडणार !
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Oct 19, 2022 | 1:39 PM
Share

चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : ३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई (Nashik-Mumbai) राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला आहे. नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका असा सज्जड दम त्यांनी दिला आहे. छगन भुजबळ यांनी आज नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांची कानउघडनी करत फैलावर घेतले होते. यावेळी नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी साळुंखे, गोंदे ते पडघा टोलवेज पीक इंफ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी नाशिक ते मुंबई रस्त्यावरून छगन भुजबाळांनी नितीन गडकरी यांना विनंती केली होती, मात्र अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

मुंबई आग्रा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अनेकांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला असल्याचे भुजबळांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच नॅशनल हायवे यांना याबाबत पत्र व्यवहार केला असून लवकर रस्त्याचे काम करावे अशी विनंती केली आहे.

मात्र अद्यापही रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याने आज छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते इगतपुरी दरम्यान रस्त्याची पाहणी केली.

यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना ३१ ऑक्टोबर पर्यंत रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास १ नोव्हेंबर पासून टोल बंद करण्याचा इशारा दिला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?