फडणवीस यांनी काय लोकांना गोळ्या मारण्यास सांगितले…छगन भुजबळ यांचा सुप्रिया सुळेंना टोला

| Updated on: Feb 03, 2024 | 11:31 AM

Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख शरद गायकवाड याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारला घेरले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आता भुजबळ यांनी मत मांडले आहे.

फडणवीस यांनी काय लोकांना गोळ्या मारण्यास सांगितले...छगन भुजबळ यांचा सुप्रिया सुळेंना टोला
chagan bhujbal
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

चंदन पुजाधिकारी, नाशिक, दि.3 फेब्रुवारी 2024 | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला. शिंदे गटाच्या शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर हल्ला केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. फडणवीस यांनी काय लोकांना गोळ्या मारण्यास सांगितले होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.

काय म्हणाले भुजबळ

भाजपकडे कुठलीही नैतिकता राहिलेली नाही. पोलिस स्टेशनमध्ये फायरिंग करतात ही कसली सत्तेची मस्ती आहे. मी लोकसभेत हा मुद्दा मांडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री यांना भेटणार आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे याची मागणी करणार आहे. या प्रकरणात छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फडणवीस यांनी काय लोकांना गोळ्या मारण्यास सांगितले होते का ? या प्रकरणात त्यांचा काय संबंध ? या प्रकरणात दोन लोकांचे वैयक्तीक भांडण दिसत आहे. अशी वैयक्तीक भांडणे सुरुच असतात. मला सुद्धा एक जण धमकी देत आहे. जीवे मारण्याची धमकी देत आहे. आता या प्रकरणात फडणवीस काय करणार ? ते कायद्यानुसार कारवाई करतील.

गोळीबार प्रकरणामुळे आश्चर्य

भाजप आमदाराकडून गोळीबार प्रकरणाचे मला आश्चर्य वाटले. कारण पोलीस ठाण्यात हा गोळीबार आहे. त्याचे कारण काय हे स्पष्ट झाले नाही. ज्यांना गोळ्या लागल्या त्यांचे प्राण वाचवावे, हे महत्वाचे आहे. या प्रकरणात नक्की काय तेथे घडले हे पाहावे लागणार आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यावर हल्ला झाला होता का ? त्यांनी प्रतिकार म्हणून गोळीबार केला का ? या प्रकरणात एकच बाजूवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. अन्यथा अंतरवली सराटीसारखे होईल. अंतरवलीत पोलिसांवर हल्ला झाला होता. ८० पोलीस जखमी झाले होते. त्यानंतर लाठीमाराचे आदेश दिले गेले. परंतु दुसरीच बाजू समोर आली. पाहिली आली नाही. या प्रकरणात काय झाले ते पाहावी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

हरिभाऊ राठोड लोकांना मुर्ख बनवताय

हरिभाऊ राठोड सर्व लोकांना मुर्ख लोकांना बनवत आहे. ओबीसी प्रकरणात बबनराव तायवाडे यांची काही मते आहे. ती बरोबर आहे. परंतु हरिभाऊ म्हणतात, ओबीसीचे १७ टक्के आरक्षण आहे, त्यातील दहा टक्के मराठा समाजास द्या, सात टक्के ओबीसींना द्या, हे चुकीचे आहे.

हे ही वाचा

भाजप आमदाराची दबंगगिरी, पोलिसी ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार, आमदारास अटक