AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर छगन भुजबळ यांची कबुली, थेट मान्य केले…मोठे विधान करत म्हणाले…

chhagan bhujbal upset: मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय? मंत्रिपद किती वेळा आले आणि किती वेळा गेले भुजबळ संपले कधी संपले नाही? असे वक्तव्य करत त्यांनी पक्षातील बड्या नेत्यांना आपली ताकद दाखवण्याचे संकेत दिले.

अखेर छगन भुजबळ यांची कबुली, थेट मान्य केले...मोठे विधान करत म्हणाले...
chhagan bhujbal
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 16, 2024 | 12:22 PM
Share

chhagan bhujbal upset: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा रविवारपासून सुरु होती. अखेर सोमवारी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. ते म्हणाले, होय मी नाराज आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय? मंत्रिपद किती वेळा आले आणि किती वेळा गेले भुजबळ  कधी संपले नाही? असे वक्तव्य करत त्यांनी पक्षातील बड्या नेत्यांना आपली ताकद दाखवण्याचे संकेत दिले.

वैतागून दिले उत्तर

छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरु झाली. त्यानंतर भुजबळ मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात आले नाही. सोमवारी सकाळी भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे निकटवर्तीय असलेले प्रमोद हिंदूराव यांना पक्षाने त्यांना भेटण्यासाठी पाठवले. त्या भेटीनंतर भुजबळ यांची नाराजी दूर झाली नाही. सोमवारी दुपारी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी वैतागून आपण नाराज असल्याचे मान्य केले. होय, मी नाराज आहे, असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

बॅनरवर जागा नसणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बॅनर ठिकठिकाणी लागले आहे. त्या बॅनरवर छगन भुजबळ यांचा फोटो नाही? त्यावर ते म्हणाले, पक्षात बॅनरवर फोटो नाही, कारण बॅनरवर जागे नसेल, असे उत्तर भुजबळ यांनी दिले. पक्षातील सर्वोच्च नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिले नाही, त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, मला मंत्रिमंडळात का घेतले गेले नाही, हे त्यांना विचारा. पक्षाच्या नेत्यांना विचारा. त्याचे उत्तर मी कसे देऊ.

अजित पवार यांच्याशी संवाद नाही

अजित पवार यांच्याशी काही संवाद झाला का? त्यावर भुजबळ म्हणाले, मी कालपासून अजित पवार यांच्याशी बोललो नाही. मला ते गरजेचे वाटले नाही. मी पुढे काय करायचे त्याचा निर्णय अजून घेतला नाही. त्यासंदर्भात मी माझ्या लोकांशी बोलणार आहे. समता परिषदेच्या लोकांशी बोलणार नाही. त्यानंतर निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट