AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavdya Dongar Case: कुणालच्या आजोबांचा धक्कादायक खुलासा, 15-20 दिवसांपूर्वी घडलं होतं असं काही की…

Kunal Chandgude Grand Father Reaction: छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या घटनेत चांदगुडे कुटुंबातील तीन लोकांचा जागीच अंत झाला. आता या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुरलीधर चांदगुडे यांच्या वडिलांची प्रतिकिया आता समोर आली आहे.

Khavdya Dongar Case: कुणालच्या आजोबांचा धक्कादायक खुलासा, 15-20 दिवसांपूर्वी घडलं होतं असं काही की...
| Updated on: Aug 23, 2026 | 6:17 PM
Share

Kunal Chandgude Case: छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या घटनेत चांदगुडे कुटुंबातील तीन लोकांचा जागीच अंत झाला. कुणाल (वय १९ वर्षे), त्याचे वडील मुरलीधर (वय ४८ वर्षे) आणि आई संगीता (वय ४२ वर्षे) यांचा एकाचवेळी दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला असं समजलं होतं की कुणालला आयफोन हवा आहे आणि या मागणीमुळे त्याने हे पाऊल उचलले आहे, पण नंतर समजले की प्रकरण काही तरी वेगळेच आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरु आहे. आता या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुरलीधर चांदगुडे यांच्या वडिलांची प्रतिकिया आता समोर आली आहे.

कुणाल कौटुंबिक वादातून मानसिक तणावाचा सामना करत होता. शुक्रवारी सकाळी क्लाससाठी घराबाहेर पडलेला कुणाल अचानक खवड्या डोंगरावर पोहोचला. नंतर त्याने थेट डोंगराचे कट गाठले, त्याला वाचवण्यासाठी पुढे धावून गेलेल वडील मुरलीधर चांदगुडे पाय घसरुन मुलासह दरीत कोसळले. पती आणि मुलगा डोळ्यांदेखत दरीत कोसळल्याची घटनेमुळे आई संगीताला धक्का बसला.

मुलगा मुरलीधर चांदगुडेबद्दल बोलताना वडिल भावूक

कुणाल आणि त्याचे वडील म्हणजेच मुरलीधर यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना सुरुवातीला थेट देण्यात आली नव्हती. सुरुवातीला मुलाचा पाय मोडला आहे, असे आम्हाला सांगण्यात आले. मात्र, मृतदेह घरी आणल्यानंतर आम्हाला खरी घटना समजली.” अशी प्रतिक्रया आता मुरलीधर यांच्या वडिलांनी दिली आहे. दरम्यान, मुरलीधर यांच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या शेवटच्या भेटीबद्दलही सांगितले, “मुरलीधर लग्नानंतर आमच्याशी फारशा बोलत नव्हता. कधी आला तर थेट शेतात निघून जायचा. आम्ही त्याला शेताची वाटणी आधीच दिली होती.  मात्र, घटनेच्या अवघ्या 15-20 दिवसांपूर्वी मुरलीधर घरी आला होता, तेव्हा त्याच्या आईची प्रकृती चांगली नव्हती, म्हणून कामात त्याने मदत केली. आईला आता फार उठता-बसता येत नसल्याचे पाहून त्याने स्वत: भांडी घासली, भाजी केली आणि आमच्यासोबत छान गप्पाही मारल्या,”

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार