AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavdya Dongar Case: खवड्या डोंगरावरुन उडी मारणाऱ्या कुणालच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, संगीता यांनी व्हिडिओतून केलेली पोलखोल

Khavdya Dongar Case: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या खवड्या डोंगरावरून कुटुंबाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात अख्या कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला आहे. आता या प्रकरणात नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे.

Khavdya Dongar Case: खवड्या डोंगरावरुन उडी मारणाऱ्या कुणालच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, संगीता यांनी व्हिडिओतून केलेली पोलखोल
| Updated on: Aug 23, 2026 | 4:58 PM
Share

Khavdya Dongar Case: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या खवड्या डोंगरावरून कुटुंबाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात अख्या कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला आहे. मुरलीधर चांदगुडे हे राहणार मूळचे जालन्यातील अंबड तालुक्यातल्या धनगर पिंपळगाव येथील रहिवासी आहेत. मात्र, कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केले. लग्नानंतर ते संभाजीनगरला राहत होते. ते ट्रक चालवून त्यांचा उदरनिर्वाह करत होते. आता या प्रकरणात नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे.

संगिता यांचे युट्युब चॅनेल आहे. ते युट्युबवर अनेक व्हिडिओ बनवायच्या. घरगुती वादासंदर्भात त्यांनी अनेक व्हिडिओ बनवले आहेत. अनेक व्हिडिओमध्ये त्यांनी मुरलीधर यांच्या बहिणीवर आरोप केले आहे. यावरुन असे स्पष्ट होते की त्यांच्या घरात अनेक वाद सुरु होते. मुरलीधर यांच्या कुटुंबाला ते बायको आणि मुलासोबत राहतात ते पसंत नसल्याचे समजत आहे.

संगिता यांनी एका व्हिडिओमध्ये मुरलीधर यांच्या बहिणीवर एक आरोप केला आहे. त्या स्पष्ट म्हणाल्या की, आज तुम्हाला तुमच्या स्वत:च्या पोरापेक्षा ती बहिण महत्त्वाची वाटली, जिने कधी तुम्हाला विचारलं पण नाही, की तु कसा आहेस? आणि त्या बहिणीसाठी तुम्ही आज माझ्या मुलावर हात घातला ना, ती तुम्हाला एक दिवस ना कुठलाच ठेवणार नाही शब्द आहे माझा, लक्षात राहू द्या फक्त.”

या व्हिडिओतून असे समजते की मुरलीधर आणि संगिता यांचा संसारात त्यांच्या बहिणीची लुडबुड होती. तर संगिता यांनी केलेल्या आरोपावरुन असं समजत आहे की बहिणीच्या सांगण्यावरुन त्यांच्या घरात वाद व्हायचे, बहिणाच्या सांगण्यावरुन मुरलीधर घरात संगिता आणि त्यांचा मुलगा कुणालला मारायचे. आता या प्रकरणा संदर्भात पोलिस वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहे. नेमकी कोणाची चूक आहे, कोण दोषी आहे, नेमकं घडलं काय होतं की, कुणालने इतके टोकाचे पाऊल उचलले, या सगळ्यावर आता पोलिस कसून तपास करत आहे.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं